Health : शरीरातील निकोटीन फ्लश आऊट करण्यासाठी हे १० पदार्थ आहेत उपयुक्त !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 1:01 PM
आपणही फक्त स्टाइल आणि कूल दिसण्याच्या प्रयत्नात सिगारेट ओढत असाल तर आताच सावध व्हायला हवे. सिगारेटमधील निकोटीनमुळे आपला जीव जाऊ शकतो.
-रवींद्र मोरे धुम्रपान सध्याच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनलले आहे. दरवर्षी धुम्रपानामुळे ६ लाख लोकांचा मृत्यू होत असतो. धुम्रपानापासून परावृत्त होण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी प्रत्येक चित्रपटात आणि मालिकेत जेव्हाही धुम्रपानाचे सीन येते त्यावेळी धुम्रपानाबाबतचा धोक्याचा संदेश दिला जातो. शिवाय प्रत्येक बिडी, सिगारेट आणि गुटख्याच्या पुड्यांवर कॅन्सरचे प्रतिकात्मक चित्रही छापण्यात आले आहे. एवढे करुनही फक्त सेलिब्रिटी आणि अन्य हायफाय लाइफस्टाइल जगणाऱ्यांचे अंधानुकरण करुन धुम्रपान केले जाते. आपणही फक्त स्टाइल आणि कूल दिसण्याच्या प्रयत्नात सिगारेट ओढत असाल तर आताच सावध व्हायला हवे. सिगारेटमधील निकोटीनमुळे आपला जीव जाऊ शकतो. सिगारेट ओढणे धोकादायक तर आहेच म्हणून ही सवय मुळापासून नष्ट व्हायलाच हवी. मात्र ही सवय आपणास बऱ्याच कालावधीपासून असेल तर आपल्या शरीरात निकोटीनचे प्रमाण वाढतच जाते. शरीरातील निकोटीनचे हे प्रमाण कमी करण्यासाठी काही पदार्थ असून त्यांच्या सेवनाने निकोटीन फ्लश आऊट होण्यास मदत होते. * केळी केळात अँटीआॅक्सिडंट असतात. हे तुमच्या शरीरातील निकोटीन बाहेर काढण्यास मदत करतात.* ब्रोकोली ब्रोकोलीमधील विटॅमिन ‘सी’मुळे पचनक्रिया सुधारून फुफ्फुसांचे विषारी पदार्थांपासून रक्षण करते. शिवाय यातील विटॅमिन बी-५ मुळेही निकोटीन फ्लश आऊट होण्यास मदत होते. * गाजर धुम्रपान केल्याने शरीरातील विटॅमिन ए व सी संपते. अशावेळी रोज गाजर खाल्ल्याने तुमच्या शरारातील विटॅमिन ए, सी व के यांची कमतरता भरून निघते. * संत्रीसंत्र्यात मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी आढळते. संत्र्याचे सेवन केल्याने निकोटीन घेण्याची इच्छा मंदावते. * पालक पालकात फॉलिक अॅसिड व विटॅमिन बी-९ असते. बी-९ आपल्या शरीरातून निकोटीन बाहेर काढण्यास मदत करते. फॉलिक अॅसिड मानसिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठीही उपयोगी आहे. * अद्रकअद्रक खाल्ल्याने तुमची निकोटीन खाण्याची इच्छा कमी होते. शिवाय यामुळे निकोटीनपासून होणारे नुकसान कमी करते. तुम्हाला याचा पूर्ण उपयोग करायचा असेल तर कच्चे आले खा. * क्रेनबेरी क्रेनबेरीतील आम्ल शरीरातील निकोटिन फ्लश आऊट करते. * लिंबू लिंबातील सायट्रिक अॅसिड व विटॅमिन सी धुम्रपानातून होणाºया वाईट परिणामांचा सामना करून तुमचे शरीर निरोगी बनवते. * गहू (व्हीटजर्म)व्हीटजर्म तुम्हाला ह्रदयरोगापासून सुटका मिळवून देण्यासाठी मदत करते. * डाळिंब डाळिंब तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास व रेड ब्लड सेल्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. Also Read : ALERT : आपण धुम्रपान करताय! तर आपल्यासाठी या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्या ! : HEALTH : घरगुती उपायाने सोडा 'धुम्रपान', फक्त ५ मिनिटात दिसेल परिणाम !