Health : आपल्या घरातील ‘या’ ४ गोष्टी विष समान तर नाहीत ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2017 9:43 AM
आपण काही गोष्टी घरात फायद्यासाठी आणतो. मात्र कदाचित आपणास माहित नसेल, की अशा काही गोष्टी आहेत ज्याचा आपल्या घरावर आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो.
आपण काही गोष्टी घरात फायद्यासाठी आणतो. मात्र कदाचित आपणास माहित नसेल, की अशा काही गोष्टी आहेत ज्याचा आपल्या घरावर आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. त्यांच्या बाबतीत माहिती घेतल्यास आपण त्यापासून नक्कीच सावध व्हाल. जाणून त्या चार गोष्टींबाबत ज्या आपल्यासाठी विष समान आहेत. * एअर कंडिशनर शरीराला थंडवा देणाऱ्या या एअर कंडिशनरमधून विषारी हवा निघते, जी पर्यावरणाला प्रदूषित करते. * अगरबत्तीपूजा करण्यासाठी वापरण्यात येणारी अगरबत्ती पर्यावरणाला प्रदूषित करण्याबरोबरच आपल्या आरोग्यासाठीदेखील हानिकारक ठरते. अगरबत्तीच्या धूरामुळे आपणास ह्रदयाचा विकार होऊ शकतो. * विषारी रोपेकदाचित काही लोकांनाच माहित असेल की, डंब केन सारखे काही रोपेदेखील कार्बन डाय आॅक्साइड सोहतात. मात्र पूरेशा माहिती अभावी आपण त्या रोपांना घरात लावतो. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. डंब केन असे एक सुंदर हाऊसप्लांट आहे जे एका मिनिटात कोणाचाही जीव घेऊ शकते. या रोपाचा प्रत्येक भाग विषारी आहे. * मच्छरछाप अगरबत्तीडास, मच्छर पळविण्यासाठी आपण या अगरबत्तीचा वापर करतो. मात्र याच्या धूरामुळे हवेतील कार्बन डाय आॅक्साइडचे प्रमाण वाढते ज्यामुळे पर्यावरण प्रदूषित होते.