Health : जिम जॉइननंतरच्या या ‘६’ चुका आरोग्यासाठी घातकच !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 6:19 AM
बऱ्याचदा जिममध्ये वर्कआउट करताना किंवा त्यानंतर आपण अशा काही चुका करतो त्यामुळे आपण अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी नुकसानच जास्त होते. आज आम्ही आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या जिममध्ये किंवा जिमनंतर करु नयेत.
सध्या प्रत्येकाचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. सेलिब्रिटींचा विचार केला तर आपल्यापेक्षा त्यांचे लाइफ खूपच बिझी आहे. तरी ते काहीही करुन वेळात वेळ काढून आपले फिटनेस टिकविण्यासाठी रोज वर्कआउट करतातच. त्यांचेच अनुकरण करून आपणही आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढतो आणि जिममध्ये जातो. मात्र बऱ्याचदा जिममध्ये वर्कआउट करताना किंवा त्यानंतर आपण अशा काही चुका करतो त्यामुळे आपण अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी नुकसानच जास्त होते. आज आम्ही आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या जिममध्ये किंवा जिमनंतर करु नयेत. * सप्लीमेंट शरीरात लवकर बदल घडविण्यासाठी बरेचजण वर्कआउटनंतर सप्लीमेंट घेणे सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र असे करणे आरोग्यासाठी खूपच घातक ठरू शकते. सप्लीमेंट आरोग्यासाठी चांगले नसल्याने त्याऐवजी अन्य हेल्दी फूड्सला प्राधान्य द्यावे. * कार्बोहाइड्रेटजिममध्ये वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीनचे सेवन करणे फायदेशीर असते. मात्र वर्कआउट केल्यानंतर चुकूनही कार्बाेहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. * कार्डियो एक्झरसाइजजिममध्ये एक्झरसाइजची सुरुवात कार्डियोने करावी, मात्र वर्कआउट केल्यानंतर कधीही कार्डियो एक्झरसाइज करू नये. वर्कआउटची सुरूवात कार्डियो एक्झरसाइजने केल्यास त्यानंतर रेग्युलर एक्झरसाइज करावी. * स्ट्रेचिंग बऱ्याचदा वर्कआउट केल्यानंतर शरीरात वेदना होतात. त्यापासून आराम मिळण्यासाठी स्ट्रेचिंग करणे खूपच फायदेशीर ठरते. वर्कआउट केल्यानंतर किंवा कार्डियो एक्झरसाइज केल्यानंतर स्ट्रेचिंग करावे. यामुळे वर्कआउट संपल्यानंतर शरीरातील वेदनांपासून आराम मिळतो. * स्पोर्ट्स ड्रिंकएक्झरसाइज संपल्यानंतर शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पुर्ण करण्यासाठी स्पोर्ट्स ड्रिंकचे सेवन बहुतेक लोक करतात, मात्र हे शरीरासाठी अयोग्य आहे. स्पोर्ट्स ड्रिंकने शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता तर दूर होते मात्र यात शुगर असल्याने अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होतात. त्याऐवजी नारळ पाणी घेतल्यास फायदेशीर ठरेल. * कॅलरी बर्नबरेच जण वर्कआउट केल्यानंतर किती कॅलरी बर्न झाल्या आहेत, या हिशोबाने जंक फूड किंवा अन्य पदार्थ सेवन करतात, जे योग्य नाही. यामुळे शरीरात फॅट वाढू शकते. Also Read : Alert : वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका, अन्यथा..!