शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
3
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
4
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
5
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
6
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
7
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
8
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
9
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
10
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
11
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
12
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
13
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
14
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
15
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
16
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
17
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
18
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
19
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
20
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

HEALTH : हे आहेत मेथी खाण्याचे 10 मोठे फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2017 6:38 AM

बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे आपणास माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

-Ravindra Moreमेथीच नव्हे तर मेथीचे बीसुद्धा खूप गुणकारी असल्याने संपूर्ण भारतात मोठ्या आवडीने मेथीचे सेवन केले जाते. मेथीमध्ये विशिष्ट गुणधर्म असून अ‍ॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्याना मेथी दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.मेथी खाण्याचे काय आहेत फायदे* मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो. तसेच एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाचीही समस्या दूर होते. * मेथी केसांसाठीही उपयुक्त आहे. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. * केस गळती थांबविण्यासाठी मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा.*  मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल. * मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.* पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.* मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.* अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.* उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचा दाणा घ्या. त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चाऊन खाऊन टाका. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल.* मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.