शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

HEALTH : हे आहेत मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 1:09 PM

उन्हाळ्यात आरोग्य जपण्यासाठी माठातीलच पाणी का प्यावे, हे जाणून घेण्यासाठी वाचा हि बातमी..!

-Ravindra Moreमातीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषकतत्त्वे मिळतात. पूर्वजांपासून मातीचे महत्त्व सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मातीचा घरगुती वापरात कसा उपयोग करावा याचेही ज्ञान त्यांना होते. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ बनवायला सुरवात केली. आजही ही परंपरा बऱ्याच ठिकाणी जपली जात आहे. मात्र आपणास हे माहित नसेल की, मातीची भांडी का वापरली जायायची? त्याचे फायदे काय आहेत? आज आम्ही आपणास मातीच्या माठातून पाणी पिण्याचे काय फायदे होतात याबाबत माहिती देत आहोत. काय आहेत फायदे?* घशासाठी उपयुक्तज्यांना सर्दी, खोकला आणि अस्थमाचा त्रास असतो, त्यांना फ्रिजमधील थंड पाणी वर्ज्य केले जाते. अशावेळी माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले अस* नैसर्गिक थंडावा मिळतोमातीच्या माठाला लहान लहान छिद्र असतात, त्यामुळे त्याच्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. शिवाय फ्रिजमधील अतिथंड पाण्याच्या सेवनाने अनेक व्याधी निर्माण होतात. यासाठी माठातले पाणी स्वस्त, पर्यावरण पूरक आणि आरोग्यदायी आहे. * मातीतले उपयुक्त घटक ज्या मातीचा माठ बनविण्यासाठी उपयोग होतो त्या मातीत भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे घटक पाण्यात मिसळतात, परिणामी त्या पाण्याने आपल्या शरीराला फायदाच होतो.* मेटॅबॉलिझम सुधारण्यात मदत मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.* माती नैसर्गिकरित्या अल्कलाईनशरीरातील अ‍ॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अ‍ॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.   * केमिकल्स रहीतबऱ्याच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ‘बीपीए’ नावाचे हानिकारक केमिकल असते, ज्याचा परिणाम आरोग्यावर विपरित होतो. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.* उष्माघातापासून संरक्षणउन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी उपयुक्त ठरते. ते.