HEALTH : वर्कआऊटनंतर मांसपेशीतील वेदना दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत प्रभावी उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 11:21 AM
कोणते आहेत उपाय, जाणून घेण्यासाठी क्लिक करा !
काही लोकांचे म्हणणे आहे की, वर्कआऊट करतेवेळी किंवा नंतर जोपर्यंत शरीरात वेदना होत नाहीत तोपर्यंत चांगला रिझल्ट मिळत नाही. मात्र हा विचार चुकीचा आहे. जर आपण क्षमतेपेक्षा जास्त वेट लिफ्टिंग किंवा वर्कआऊट करणार तर मसल्सला नुकसान पोहचून वेदना होतील. आपणास वेदनेशिवाय वर्कआऊट करायचे आहे, हे लक्षात असू द्या. चला जाणून घेऊया विना वेदना वर्कआऊट कसे करायचे. * बर्फ वर्कआऊटनंतर ज्या ठिकाणी वेदना होत असेल त्याठिकाणी बर्फ लावल्याने सूज आणि दूखणे कमी होते. यासाठी मांसपेशींमध्ये जशाही वेदना जाणवू लागल्या त्वरित त्याठिकाणी बर्फ लावावा. बर्फ लावताना १५ मिनिटांपेक्षा जास्त नको. * स्ट्रेचिंगमांसपेशींमध्ये तणाव आणि वर्कआऊटनंतर वेदनांसंबंधी समस्यांवर प्रभावी उपचार म्हणजे स्ट्रेचिंग होय. स्ट्रेचिंगमुळे ज्या मजबूत मांसपेशी असतात त्या लवचिक होतात आणि त्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते. यामुळे एक्झरसाइजअगोदर किंवा नंतर स्ट्रेचिंग करावे आणि एक्झरसाइजअगोदर वार्मअप अवश्य करावे. * मसाज थेरेपीमसाज थेरेपी तर सर्व मांसपेशींच्या दुखण्यावर फायदेशीर आहे. विशेषत: ही थेरेपी लुम्बर बॅक पेनमध्ये खूपच लाभदायक ठरते. यामुळे वर्कआऊटनंतर मांसपेशींमध्ये वेदना होत असतील तर मसाज थेरेपी करावी. * हीट थेरेपीउष्ण तापमानामुळे रक्त प्रवाहात वृद्धी होण्यास मदत होते. जर एक्झरसाइजनंतर मांसपेशींमध्ये वेदना होत असेल तर हलक्या उबदार पाण्याने अंघोळ करावी. यामुळे मांसपेशा शांत होतील आणि त्यात वेदनाही होणार नाहीत. दुखऱ्या मांसपेशींवर हीटिंग पॅडचा वापर केल्यासही आराम मिळेल. * ओमेगा ३-एसस्ट्रेंथ ट्रेनिंगनंतर सूजलेल्या आणि वेदनायुक्त मांसपेशींवर ओमेगा ३-एस फायदेशीर ठरते जे माशांच्या तेलात आढळते. यासाठी ट्रेनिंगनंतर माशांच्या तेलाची एक गोळी घ्यावी. शिवाय पालक आणि नट्समध्येही ओमेगा ३-एस नैसर्गिक रित्या आढळते.Also Read : Health : ...म्हणून विना मेडिकल चेकअप जॉईन करू नये जिम ! : Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !