Health : हे आहेत मिठाचे अन्य उपयोग !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2017 12:28 PM
आपण मिठाचा वापर फक्त अन्न पदार्थाची चव वाढविण्यासाठीच करतो. मात्र मीठाचे अन्य उपयोगही आहेत, हे आपणास कदाचित माहित नसेल.
आपण मिठाचा वापर फक्त अन्न पदार्थाची चव वाढविण्यासाठीच करतो. मात्र मिठाचे अन्य उपयोगही आहेत, हे आपणास कदाचित माहित नसेल. जाणून घेऊया मिठाचे अन्य फायदे...* पिवळे दात पांढरे शुभ्र करण्यासाठी एक चमचा मीठ आणि दोन चमचे बेकिंग सोडा एकत्र करून या मिश्रणाने दात घासावे. शिवाय यामुळे हिरड्यादेखील मजबूत होण्यास मदत होते. * घसा खराब झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यातील सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मामुळे घशाला आराम पडतो.* मधमाशी चावल्यास तो भाग ओला करून त्यावर मीठ लावल्यास वेदना कमी होतात.* शारीरिक थकवा घालविण्यासाठीही मिठ उपयुक्त आहे. यासाठी मिठाचे पाणी असलेल्या टबमध्ये थोडावेळ बसले तर संपूर्ण शरीराचा थकवा जातो व आराम मिळतो शिवाय थकल्याने पाय दुखत असल्यास मूठभर मीठ घातलेल्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास पायांना दुखणे बंद होते. * शरीरावरील मृत त्वचा काढण्यासाठी अंघोळीनंतर त्वचा ओली असताना कोरड्या मिठाने घासावी. यामुळे रक्ताभिसरणदेखील वाढते. हा मसाज झाल्यावर पुन्हा अंग पाण्याने स्वच्छ करावे.* डास किंवा किडा चावल्यास तो भाग प्रथम मिठाच्या पाण्यात बुडवावा आणि नंतर त्याजागी तूप आणि मीठ याचे मिश्रण लावावे. Also Read : मीठाला पर्याय ‘फिश सॉस’चा