HEALTH : केस पांढरे होण्याची ‘ही’ आहेत कारणे !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 10:05 AM
ही कारणे जाणून आपले केस नक्कीच पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या काय आहेत कारणे !
सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाइल आपण नेहमीच पाहतो. बहुतांश आपण त्यांना त्यांच्या हेअरस्टाइल मुळेच ओळखतो. हवी तशी हेअरस्टाइल ते करु शकतात, कारण त्यांचे केस निरोगी असतात. चकमदार, काळेभोर आणि घनदाट केस हे निरोगी केसांचे लक्षणे होय. निरोगी केसांसाठी प्रत्येक सेलेब्स काळजी घेत असतात. मात्र आपण आपल्या केसांची योग्य काळजी घेत नसल्याने केसांचे आरोग्य खराब होते आणि एैन तारुण्यात केस पांढरे होतात. पांढऱ्या केसांमुळे आपण म्हातारे दिसू लागतो. विशेष म्हणजे हेल्दी व्यक्तींचे केस सुद्धा पांढरे होतात आणि यामुळे त्यांचा लुक पूर्णत: खराब दिसू लागतो. * केस पांढरे होण्याची कारणे पांढऱ्या केसांची सुरुवात सर्वप्रथम पुरुषांच्या दाढीपासून आणि महिलांच्या कानाजवळील केसांपासून होते. केसांच्या समस्यांचे तज्ज्ञ सांगतात की, केस पांढरे होण्याची दोन कारणे असतात, ज्यात पहिले तणावाची स्थिती आणि दुसरे म्हणजे केसांना पोषक तत्त्वाची कमतरता होय. * तणावाची स्थिती या कारणाने केवळ संपूर्ण आरोग्यच खराब होत नाही तर याचा परिणाम आपल्या केसांवरदेखील होतो. ताणतणावात राहिल्याने केस तर पांढरे होतातच मात्र केसांच्या अन्य समस्याही निर्माण होतात. तणावात समतोल आहार घेतला जात नसल्याने आवश्यक पोषक तत्त्व शरीरास मिळत नाहीत सोबतच तणावात धुम्रपान, मद्यपान आदी व्यसनाचे प्रमाणही वाढते ज्याचा प्रतिकुल परिणाम शरीरावर होतो. * केसांना पोषक तत्त्वांची कमतरताशरीरात विटॅमिन बी, आयर्न, कॉपर आणि आयोडिनची कमतरता भासल्याने केसांना आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाही. यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या पूर्णत: बरी होणे कठीण आहे, मात्र डॅमेज कंट्रोल करुन ही समस्या अधिक वाढण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी आपणास फोलिक अॅसिड आणि व्यसनांपासून लांब राहावे लागेल. सोबतच आपल्या लाइफस्टाइलमध्येही काही बदल आणि डायटच्या साह्याने या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो. Also Read : Beauty : दाढी-मिशीच्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी...! : HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती !