हाडांमधून किंवा जाइंट्समधून कधी कधी कट-कट (Bone Cracking Sound) असा आवाज येतो. हा आवाज येणं सामान्य आहे आणि असं होणं सामान्यपणे नुकसानकारकही नसतं. याचा हा अर्थ नाही की, तुम्हाला जॉइंट्सचा Arthritis हा आजार आहे. जॉइंट्समधून असा आवाज आल्यावर अनेक आरामही मिळतो आणि जॉइंट्सला याने गतीही मिळते. २०१८ मधील एका रिसर्चमध्ये जॉइंट्समधून असा आवाज का येतो आणि याचं वैज्ञानिक कारण काय आहे सांगण्यात आलं आहे.
एक्सपर्ट सांगतात की, जसजसं वय वाढतं, जॉइंट्समधून असा आवाज येणं वाढू शकतं. याचं कारण हे आहे की, वय वाढल्याने जॉइंट्सचे काही कार्टिलेज खराब होतात. अनेकदा अशाप्रकारचा आवाज वेदना किंवा सूजेसोबत येतो. अशावेळी डॉक्टरांना संपर्क करणं चांगलं राहतं.
हाडांमधून आवाज येण्याला क्रॅकिंग किंवा पॉपिंग असंही म्हटलं जातं आणि मेडिकल भाषेत याला क्रेपिटसचं रूप मानलं जातं. २०१७ मधील एका रिसर्चनुसार, संयुक्त राज्य अमेरिकेत अशाप्रकारच्या २५ टक्के ते ४५ टक्के केसेस बघायला मिळतात. एका दुसऱ्या रिसर्चनुसार, ज्या लोकांना बोटं मोडण्याची सवय असते, त्यांच्या शरीराच्या इतर जॉइंट्समध्ये अशाप्रकारचा आवाज येण्याची शक्यता अधिक असते. चला जाणून घेऊ याचं मुख्य कारण.
हाडांमध्ये क्रॅकिंगचं कारण
जॉइंट्समध्ये क्रॅकिंगची वेगवेगळी कारणं होऊ शकतात. हे सामान्य आहे आणि सामान्यपणे हाडांच्या आरोग्याच्या स्थितीचा संकेत नाहीये. मुळात अशाप्रकारच्या आवाजाला अजूनही पूर्णपणे समजून घेतलं गेलं नाहीये. पण याची अनेक कारणे असू शकतात. पहिलं जसजसा मांसपेशींमध्ये तणाव वाढतो, हे हाडांमध्ये आवाज येण्याचं कारण बनू शकतं. दुसरं हे वय वाढल्याने होऊ शकतं. तर तिसरं कारण म्हणजे Arthritis.
शांत राहण्याचा प्रयत्न करा
जर तुम्हाला बोटं मोडण्याची सवय असेल तर असं करणं तुम्ही टाळलं पाहिजे. अशाप्रकारचे लोक नेहमीच आपले जॉइंट्स, मान किंवा पाठ मोडण्याचा प्रयत्न करत असतात.
फिजिकल अॅक्टिविटी करा
फिजिकल अॅक्टिविटीमध्ये बिझी राहून हे टाळता येऊ शकतं. जर तुम्ही जास्त वेळ बसून राहत असाल किंवा एकाच स्थितीत जास्त वेळ उभे राहत असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकते आणि तुमच्या जाइंट्समधून आवाज येऊ शकतो. कामाच्या मधे मधे ब्रेक घ्या. एका जागी बसून काम करत असाल तर दर अर्ध्या तासाने ब्रेक घ्या.
स्ट्रेचिंग करा
ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे स्ट्रेचिंग करा. याने तुमचे जॉइंट्स मोकळे होण्यास मदत मिळते. तुम्ही रोज हलकी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता.