शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

'या' कारणामुळे भारतातील लोक होताहेत हृदयरोगांचे शिकार, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 1:46 PM

Heart Disease Causes : एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. वायू प्रदूषणामुळे आजार आणि अवेळी मृत्युचं प्रमाणही जगभरात वाढत आहे. खासकरून विकसनशील देशांमध्ये याचा अधिक प्रभाव बघायला मिळतो. 

Heart Disease Causes : भारतातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग हृदयरोगाने पीडित आहे. याच्या कारणांचा वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून शोध घेतला जातो. हृदयरोग वाढण्याची वेगवेगळी कारणेही समोर येतात. आता एका रिसर्चमधून समोर आले आहे की, प्रदूषणही याचं मुख्य कारण आहे. प्रसिद्ध मेडिकल जर्नल 'द लॅन्सेट' मधील एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. वायू प्रदूषणामुळे आजार आणि अवेळी मृत्युचं प्रमाणही जगभरात वाढत आहे. खासकरून विकसनशील देशांमध्ये याचा अधिक प्रभाव बघायला मिळतो. 

भारत हा जगातल्या सर्वात जास्त वायू प्रदूषित करणाऱ्या देशांपैकी एक आहे. याचा प्रभाव थेट लोकांच्या आरोग्यावर पडतो. जर तुम्ही वायू प्रदूषणाला चिमनीतून निघणाऱ्या केवळ सामान्य धुराच्या रूपाने बघत असाल तर वेळीच सावध व्हा. यात घरगुती प्रदूषणाचाही समावेश आहे. चुलीतून निघणारा धूर, कचरा जाळण्यातून निघणारा धूरही तुमच्यासाठी हानिकारक आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणासोबत आणि घरगुती प्रदूषणासोबत लढण्याचं एक मोठं अव्हान समोर आहे.

रिपोर्टनुसार, भारतात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्युचा आणि आजारांमुळे वाढलेल्या ओझ्याचं काही गुणोत्तर नाही. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हे सर्वात जास्त आहे. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांसाठी आणि मृत्युंसाठी काहीतरी नीति तयार करणे गरजेचं आहे. तसेच वायू प्रदूषणाला वेळीच आवर घालण्याची गरज आहे.

दरम्यान, याआधीही एका रिसर्टमधून एका आजाराबाबत माहिती समोर आली होती. अमेरिकेतील पीएलओएस बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, वायू प्रदूषण हे वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरू शकतं. रिसर्चचे मुख्य लेखक आणि बायोलॉजिस्ट आतिफ खान म्हणाले की, मानसिक आजार मग ते डिप्रेशन असो वा बायपोलर डिसऑर्डर हे तुमच्यासमोर आर्थिक आणि सामाजिक स्तरावर समस्या निर्माण करू शकतात.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य