Banana Health Benefits : केळी एक असं फळ आहे जे खायला स्वादिष्ट तर लागतच सोबत आरोग्यासाठीही वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे सिद्ध झालं आहे. केळी केवळ वजन वाढवण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टीसाठी फायद्याची ठरतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, केळींचं नियमित सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनच्या रुग्णांना फायदा होतो.
१.८० कोटी लोकांचा हृदयरोगाने मृत्यू
हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशन एक अशी स्थिती आहे ज्यात तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपप्रवाह वेगाने आणि प्रेशरने होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुसार, २०१६ मध्ये जगभरात जवळपास १७.९ मिलियन लोक म्हणजेच १ कोटी ८० लाख लोकांचा मृत्यू कार्डिओवस्कुलर आजारांनी झाला होता. ही आकडेवारी जगभरात झालेल्या एकूण मृत्यूंच्या ३१ टक्के इतकी आहे. यात ८५ टक्के मृत्यू हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे झालेत. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आजारामागे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाइल आहे.
केळीचे हाय बीपी असल्यास फायदे
केळ्यांमध्ये फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे एक्सपर्ट हायपरटेंशन आणि हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना चांगल्या आरोग्यासाठी केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यासोबतच केळीमध्ये सोडियम सुद्धा कमी प्रमाणात असतं. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना आहारातून सोडियमचा सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. केळीमध्ये असलेल्या पोटॅशिअम vasodilator चं काम करतो. याने सोडियमचा प्रभाव कमी केला जातो आणि यूरिनच्या माध्यमातून सोडियम शरीरातून बाहेर टाकलं जातं.
जास्ते केळी खाल्ल्याने साइड इफेक्ट
केळी हे फळं खाणं सर्वात सोपं आहे. वेगवेगळ्या प्रकारे केळी खाता येते. केळीचे अनेक आरोग्यदायी फायदे असेल तरी काही दुष्परिणामही आहेत. जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने नुकसान होतं. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केळी खाव्यात.
केळी खाण्याचे इतर फायदे
१) केळी खाल्याने हृदय रोग दूर राहतात - केळी हृदय रोगाने ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात. नियमीत रुपाने केळी खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. या कारणाने केळी खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. तसेच यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्या कारणाने रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज दोन केळी खाणाऱ्यांना हृदय रोग आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होत नाही.
२) केळी खाल्याने डोकं शांत राहतं - तणाव किंवा डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्याने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. कारण केळींमध्ये प्रोटीन आणि अनेक अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोकं शांत करतात.
३) ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल - केळीचं सेवन नियमीतपणे केल्याने ब्लड प्रेशर सामान्य राहतं. यात पोटॅशिअम आढळतं जे ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. तसेच याने हायपरटेंशनची समस्याही नियंत्रित राहते.
४) लहान मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी फायदेशीर - लहान मुलांच्या विकासाठी केळी फार फायदेशीर आहे. केळीमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन आढळतात ज्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. त्यामुळे लहान मुलांना नियमीत केळी द्यायला हवीत. तसेच केळी वयोवृद्धांसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबर आढळतात जे वाढत्या वयात गरजेचे असतात.