मनुके हा प्रत्येकांच्या घरात असणारं ड्रायफ्रुट आहे. मनुक्यांचा वापर गोड पदार्थांमध्ये किंवा अनेकदा रोजच्या जेवणात केला जातो. तर काही जणांना चव आवडत असल्याने, पाण्यात भिजवून किंवा नुसते मनुके खाल्ले जातात. आज आम्ही तुम्हाला मनुक्यांच्या सेवानेने शरीराला कोणते फायदे होतात याबाबत सांगणार आहोत. मनुक्यांमध्ये हेल्दी गुणधर्म असतात. यामध्ये आयर्न, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराच्या विविध समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी 5 ते 10 मनुके खाल्यानंतर पाणी प्या. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. जाणून घेऊया रिकाम्यापोटी मनुके खाण्याचे फायदे.
पोटाच्या समस्या कमी होतात
पोटाच्या समस्या, बद्धकोष्ट यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर रात्री 8 ते 10 मनुके एका ग्लासामध्ये भिजत ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी मनुक्यांसोबत पिऊन टाका. यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत होण्यासाठीही मदत होते.
रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मनुके फायदेशीर ठरतात. कारण यांमध्ये ती सर्व पोषक तत्व असतात, जी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
हाडांना मजबूती मिळते
हाडांना मजबूत करण्यासाठी मनुके सकाळी उपाशीपोटी मनुके खाणं उत्तम ठरतं. यामध्ये फायबरसोबत कॅल्शिअम आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीराची हाडांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. याशिवाय घशाचं इन्फेक्शन दूर करण्यासाठीही मदत करतो.
रक्तप्रवाह सुरळीत राहतो
रिकाम्यापोटी मनुके खाल्याने रक्त शुद्ध होण्यासोबतच लिव्हर, हार्ट आणि पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये असणारे गुणधर्म पोटातील अॅसिड कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं, जे शरीरामधील रक्त वाढविण्यासाठी मदत करतं.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते
रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने नियमितपणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे लिव्हर आणि किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत मिळते. मनुक्याच्या पाण्यामध्ये अॅन्टिऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए आणि बीटा केरोटिन यांसारखी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. जी डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी मदत करतात.
हे पण वाचा-
खुशखबर! जॉनसन अॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार
वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान
दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...
आता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी