शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करेल अळीव; आजच करा सेवन, आजारही होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 3:57 PM

अळीव खाण्याने शरीराला अगणित असे फायदे मिळतात.

Aliv Benifits : साधारणत: आपल्याकडे अळीव म्हणजे बाळंतिणीचा खुराक असं म्हटलं जातं. पण अळीव खाण्याने शरीराला अगणित असे फायदे मिळतात. तरुणांपासून वयोवृद्धांनी देखील याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.  फायबर, मिनिरल्स, व्हिटॅमिन तसेच अँटिऑक्सिडंट गुणांनी समृद्ध असणारे अळीव शरीरासाठी लाभदायक ठरतात. 

अळीव हा भारतीय खान-पानातील एक महत्वाचा पदार्थ आहे. विशेषत बाळंतपणानंतर महिलेला याचे पौष्टिक लाडू तसेच हलवा आवर्जून खाऊ घातला जातो. अळीवाच्या बियांमध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे  थंड वातावरणाच्या ठिकाणी अथवा हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये लोक आवडीने खातात. शिवाय अगदी मोजक्याच प्रमाणात याच्या बियांची पेज बनवून किंवा लाडू तयार करून कोणत्याही ऋतूमध्ये खाल्लं तर चांगलं असतं. 

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत-

अळीवामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, असं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. गर्भधारणेच्या काळात  महिलांमध्ये अनेकदा लोह, हिमोग्लोबिन या गोष्टींची कमतरता असल्याने  अ‍ॅनिमियासारख्या किंवा इतर समस्या उद्भवतात. अशावेळी महिलांनी चमचाभर अळीवाचा नियमित आहारात समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. 

बद्धकोष्ठतेवर जालीम उपाय-

अळीवाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या नाहीशा होतात. नियमितपणे त्याचं सेवन केल्यास पोट साफ राहतं. 

अळीव आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. अळीवाची खीर, लाडू यासारखे पदार्थ आवर्जून खायला हवेत. दररोज १ चमचा अळीवाचा आहारात समावेश केल्यास केसही दाट, मजबूत आणि लांबसडक होण्यास मदत होते. असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHemoglobinहिमोग्लोबीनLifestyleलाइफस्टाइल