पावसाळ्यातच अनेक आजार मान वर काढू लागतात. सध्या कोरोनाच्या माहामारीत आजारी पडण्याची लोकांना भीती वाटत आहे. कारण कोरोनाची सुरूवातीची लक्षणं सामान्य ताप, सर्दी, खोकला यांसारखी असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोनाची लागण होण्याचाी भीती असते. पावसाळ्यात अनेक ठिकाणी डास निर्माण होतात. घरात तुम्ही कितीही स्वच्छता करत असाल तरी इतर ठिकाणी अस्वच्छतेमुळे तयार होणारे डास घरात शिरायला वेळ लागत नाही.
त्यात उघड्यावर सांडपाणी, किंवा कुंडीत पाणी साचलं असेल तर डासांची संख्या वाढते. त्यातून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरतात. आज आम्ही तुम्हाला या आजारांपासून लांब राहण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. डेंग्यूचे उपचार वेळेवर केले नाहीत तर जीवघेणे आजार पसरू शकतात. ताप, सर्दी, शरीरावार लाल चट्टे येणं, सांधेदुखी ही डेंग्यूची लक्षणं आहेत. डेंग्यूच्या दुसऱ्या प्रकारात शॉकस सिंड्रोमची स्थिती उद्भवते म्हणजेच रक्तदाब कमी होतो.
डेंग्यूमुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पेशींच प्रमाण कमी होते, रक्तदाब कमी होतो. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. थंडी वाजून ताप येणे आणि नंतर गरमी वाटणे व ताप येणे, घामासोबत ताप कमी होणे आणि कमजोरी जाणवणे, दोन ते तीन दिवसांनी ताप येत राहणे. ही डेंग्यू मलेरिया या आजाराची लक्षणं आहेत.
डेंग्यूपासून बचावाचे उपाय
आजार टाळण्यासाठी प्रथम स्वच्छता महत्त्वाची आहे. घराभोवती, इमारतीच्या गच्चीवर पाणी साचू देवू नये, घरातील पाणी साठवणीची भांडी आठवड्यातून किमान एकदा कोरडी करावी. पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. तपासणीसाठी घरी येत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
आजाराची लागण झालेल्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घ्यावी, लक्षणानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. पिण्याच्या पाण्याची भांडी कोरडी करून पाणी भरावे. घराशेजारी सांडपाणी साचू न देता ते वाहते करावे यामुळे डेंग्यू आजार होण्यापासून टाळता येईल.
ब्लड टेस्ट करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही औषध घेऊ नका.जर औषधांचा पूर्ण डोज घेतला नाही तर मलेरिया पुन्हा होण्याचा धोका असतो. रुग्णाला मच्छरदानीमध्ये ठेवा. कारण डास जर रुग्णाला चावून घरातील इतर कुणाला चावेल तर त्यांना हा आजार होऊ शकतो. रुग्णाला ताप आल्यावर ७ दिवसांपर्यंत शरीरात व्हायरस कायम राहतो. जर रुग्णाला व्हायरल समस्या असतील तर त्यांच्या वस्तूंचा वापर करु नका.
(टिप : वरील सल्ले किंवा मुद्दे हे माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याकडे प्रोफेशनल सल्ले म्हणूण बघू नका. तुम्हाला काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हे पण वाचा-
खुशखबर! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी; कितपत सुरक्षित ठरणार? जाणून घ्या
देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा