कोणत्याही पदार्थांचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते. खासकरुन सकाळचा नाश्ता. सकाळच्या नाश्त्याला एक वेगळंच महत्व आहे. सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या खालीलप्रमाणे सांगता येतील.
1) गोड पदार्थ किंवा चॉकलेट
सकाळी कोणताही गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. सकाळच्या वेळी जास्त गोड पदार्थ खाल्यास शुगर लेव्हलवर प्रभाव पडतो. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणावेळी गोड खाणे फायद्याचे असते. पण सकाळी गोड खाऊ नये.
2) ब्रेड जॅम
ब्रेड आणि जॅम दोन्हीमध्ये फॅट आणि शुगरचं प्रमाण अधिक असतं. या दोन्ही पदार्थांचा रक्तावर प्रभाव होतो. ब्रेडसोबत अंडं खाणं चांगलं राहिल. पण सकाळी ब्रेड आणि जॅम खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
3) मांस
जेव्हा कधीही मांस अधिक प्रमाणात खाल्ल जातं तेव्हा काहीना काही नुकसान होतं. पण सकाळी मांस खाणं अजिबात चांगलं नाही. मांसामध्ये नायट्रेट असतं ते अधिक प्रमाणात खाल्याने त्वचेसंबंधी समस्या होतात.
4) ज्यूस किंवा शेक
फ्रूट ज्यूस तसं तर आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण सकाळी ज्यूस पिणे चांगलं नसल्याचं सांगितलं जातं. ज्यूसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅसिड असतात, जे शरीराला नुकसान पोहोचवतात.