Appendix problem : अपेंडिक्स आपल्या आतड्यांचा एक छोटासा भाग असतो. हा एका पातळ आणि छोट्या ट्यूबसारखा असतो. याची लांबी २ ते ३ इंच असते. अपेंडिक्सला दोन तोंड असतात. एक बंद असतं तर दुसरं उघडं असतं. जर या उघड्या तोंडातून अन्न अपेंडिक्समध्ये गेलं तर ते बाहेर येऊ शकत नाही. ज्यामुळे अंपेडिक्समध्ये इन्फेक्शन होऊ लागतं आणि पोटात वेदना होऊ लागतात. अशात आम्ही तुम्हाला अपेंडिक्सची सामान्य लक्षणांबाबत सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला ही समस्या असेल तर वेळीच उपचार घेऊ शकाल.
पोटात वेगवेगळ्या ठिकाणी वेदना
तशी तर पोटाच्या खालच्या भागात वेदना होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात आणि जर पोटात अपेंडिक्समुळे वेदना होत नसेल तर तुम्हाला एकाच जागेवर वेदना होतील. पण अपेंडिक्समध्ये होणाऱ्या पोटदुखीची जागा सतत बदलत असते आणि पोटात होणारी वेदना काही तासातच असह्य होते.
पोटात जास्त गॅस होणे
सामान्यपणे अनेकदा डाळ, राजना, छोले, ब्रॉकली, कोबी आणि डेअरी प्रॉडक्टच्या सेवनामुळेही पोटात गॅस तयार होतो. पण जर तुम्हाला पोटात गॅस तयार होण्यासोबतच पोटात सतत दुखत असेल आणि गॅस पास झाल्यावरही तुम्हाला आराम वाटत नसेल तर हे अपेंडिक्सतं लक्षण असू शकतं.
डायरिया आणि पोटदुखी
जर तुमचं पोट साफ राहत नसेल, कधी लूज मोशन होत असेल किंवा कधी डायरिया होत असेल हे सुद्धा अपेंडिक्सचं लक्षण असू शकतं. डॉक्टरांनुसार, वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अपेडिंक्सची वेगवेगळी लक्षणे बघायला मिळू शकतात.
उलटी आणि चक्कर
जर एखाद्या व्यक्तीला अपेंडिक्सची समस्या होत असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीला पोटादुखीसोबतच उलटी आणि चक्कर येण्याची समस्या सुरु होते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
शारीरिक हालचालीत अडचण
अपेंडिक्समुळे पोटात होणाऱ्या वेदना या थोडा वेळ बेडवर झोपल्याने किंवा शांतपणे बसून राहिल्याने दूर होते असं नाही. या वेदना सतत होत राहतात आणि कशाप्रकारची शारीरिक हालचाल केली तर वेदना अधिक वाढतात. इतकंच काय तर खोकला आल्यावर आणि शिंकल्यावरही पोटात जोरदार वेदना होतात.