Bitter Gourd For Good Health : कारल्याचं नाव ऐकताच अनेक लोक नाक मुरडतात. याची कडवट टेस्ट अनेकांना आवडत नाही. तरीही बरेच लोक असे आहेत जे आवडीने कारल्याची भाजी, कारल्याचे चिप्स खातात. महत्वाची बाब म्हणजे कारल्याने आरोग्याला अनेक फायदेही होतात. कारल्यातील तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, कारल्यासोबत काही खास पदार्थांच सेवन चुकूनही करू नये. असं केलं तर शरीरात समस्या होईल. चला जाणून कारल्यासोबत काय खाऊ नये.
कारल्यासोबत दूध
दूध आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण जेव्हा याचं कॉम्बिनेशन कारल्यासोबत होतं तेव्हा दूध शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. चुकूनही कारले खाल्ल्यावर दुधाचं सेवन करू नका. याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि जळजळीची समस्या होऊ शकते. सोबतच दह्याचे पदार्थही खाऊ नयेत.
कारल्यासोबत आंबा
उन्हाळा आला की, लोक आब्यांवर चांगलाच ताव मारतात. पण या दिवसात चुकूनही आंब्यासोबत कारल्याचं सेवन करू नका. असं केलं तर मळमळ, जळजळ आणि उलटीसारखी समस्या होऊ शकते. समस्या वाढली तर तुम्हाला डॉक्टरांकडेही जावं लागू शकतं.
कारल्यासोबत मूळा
हे लक्षात ठेवा की, जेव्हा कधी कारल्याचं सेवन कराल तेव्हा मूळा अजिबात खाऊ नये. असं केलं तर अॅसिडिटीसोबत सर्दी- पळस्याची गंभीर समस्या होऊ शकते. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, मूळा नेहमी कारल्यापासून दूर ठेवला पाहिजे. या दोघांची जोडी शरीराचं आरोग्य बिघडवते.