अनेकांना रात्रीचं जेवण झाल्यानंतर पोटात गॅस तयार होण्याची समस्या उद्भवते. पोटभर जेवल्यानंतरही चांगली झोप येत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर जाण्यात काही तास निघून जातात. पोटात अतिरिक्त गॅस जमा झाल्यामुळे ही समस्या उद्भवून अस्वस्थ व्हायला होतं. त्यामुळे डोकेदुखीची समस्या सुद्धा उद्भवू शकते. आज आम्ही तुम्हाला पोटात गॅस तयार होण्याची कारणं सांगणार आहोत.
शरीरात गॅस तयार होणं ही सामान्य प्रक्रिया आहे. आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करत असतात. पोटात अतिरिक्त गॅस तयार झाल्यास गॅस पास होण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो. जर तुम्ही रात्री जास्त जेवत असाल तर ही समस्या उद्भवू शकते.
जर रात्री तुम्ही कमी जेवला असला तरी दिवसभरातील गॅस पास होण्याची आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. खालेल्या अन्नाचे पूर्ण पचन होण्यासाठी जवळपास ६ तास लागतात. पचन व्यवस्थित न झाल्यास किंवा जास्त उपाशी राहिल्यास ही गॅस पास होतो.
पचायला जड असलेले अन्नपदार्थ खाल्यास पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे बटाटा, वाटाणे, अशा फायबर्स जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांमुळे गॅस होतो. कारण शरीरातील उर्जेचा वापर अनेकदा पूरेपुर केला जात नाही. काही पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट, फ्रुक्टोज, लॅक्टोज असतात. गॅस तयार करत असलेले घटक या पदार्थामध्ये जास्त असतात. त्याासाठी साबुदाणे, स्प्राऊट्स, ब्रोकोली, कांदा, सोडा, कार्बोनेड सोडा, गहू, बटाटा या पदार्थांचे सेवन कमी करा.
उपाय
जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय योग्य नाही. झोपायला जायच्याआधी बाहेर चालण्याचा २० मिनिटांपर्यंत चालण्याचा प्रयत्न करा.
जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसभरात पाण्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यास तुमचा रात्रीचा शारीरिक त्रास वाढू शकतो.
दोन वेळच्या जेवणातील अंतर जास्त असू नये. भूक लागल्यास अधून मधून काहीतरी खात राहा.
सिगारेट, ई-सिगारेट या पदार्थाचे सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. त्यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवते. परिणामी गॅस होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे मादक पदार्थांचे सेवन करू नका.
संक्रमणाचं कारण ठरू शकतो घामाने ओला झालेला मास्क; जाणून घ्या बचावाचे उपाय