शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

Health Tips: आधी सांधे दुखी, मग डोकंदुखी, मग ताप; वाचा पुण्यातील नव्या व्हायरसची लक्षणं व उपचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 2:27 PM

Health Tips: पावसाळ्यात साथीचे आजार होतात, सध्या पुण्यातही व्हायरल तापाची साथ सुरु आहे, तिच्यापासून बचाव कसा करायचा ते जाणून घेऊ. 

आजार कितीही मोठा असला तरी त्याच्यावर अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत.मागील कित्येक वर्षांपासून लहान लहान उपचारांमुळे रुग्णांचा आजार बरा होण्यासाठी हातभार लागत आहे. सध्या पुण्यात व्हायरल तापाची साथ सुरू आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आणि उपचार देत आहेत डॉ. अमित भोरकर!

चिकनगुनिया हा असा व्हायरस आहे ज्याच्या शरीरात येण्यामुळे  ताप येतो. चिकनगुनिया चे मुख्य लक्षण हे ताप (temperature) आहे. हा व्हायरस सर्वात आधी तंजानिया येथे आढळून आला होता. जेव्हा त्या ठिकाणी हा वायरस आढळून आला त्यानंतर त्यावर तिथे रिसर्च करून त्याला चिकनगुनिया असे नाव देण्यात आले. हा व्हायरस इ. सन 2006 मध्ये भारतात सर्वप्रथम आढळला. सर्वप्रथम तो अंदमान द्वीप वरती सापडला त्यानंतर हळूहळू भारतात सर्वत्र तो पसरत गेला.

चिकनगुनिया हा काही जास्त मोठा आजार नाही किंवा तो नीट होणारच नाही असे देखील नाही. याचे अनेक असे उपाय आहेत ज्यामुळे हा आजार ठीक होऊ शकतो. कुठलाच आजार मोठा नसतो फक्त आपले सकारात्मक विचार आणि त्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद या दोनच गोष्टी आपल्या आजार पळवून लावू शकतात. हा आजार एवढा घातक नाही की ज्यामुळे आपला मृत्यू होऊ शकेल. सामान्य व्यक्ती या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो.

चिकनगुनियाची कारणे (Chikungunya Causes)

या आजाराचे मुख्य कारण पहिले तर हा आजार मच्छराच्या चावल्यामुळे होतो. हे मच्छर आपल्या आसपास साठलेल्या घाणीमुळे तयार होतात. यामध्ये हजारो डास तयार झालेला असतात, त्यामधील काही अतिशय विषारी असतात. चिकनगुनिया हा आजार वेळेस एडेस एलबोपिक्टस (Aedes Albopictus) तसेच एडेस इज्यप्ती (Aedes Aegypti) नावाच्या मच्छरने चावल्यास होतो. हा व्हायरस मुख्यता जनावरांमध्ये किंवा पक्षांमध्ये असतो व तिथूनच आजूबाजूच्या परिसरात पसरतो.

चिकनगुनिया ची लक्षणे (Symptoms of Chikungunya)

चिकनगुनिया मध्ये एक विशिष्ट प्रकारची ताप व्यक्तीला येते. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये असे काही लक्षणे आढळून येतात जे पुढील प्रमाणे आहेत.

  • सुरुवातीच्या काळामध्ये हात आणि पायामध्ये खूप वेदना होतात. या वेदना मुख्यत्वे सांध्यांमध्ये जास्त होतात, याचबरोबर डोकेदुखी देखील वाढते.
  • रुग्णाला थंडी वाजून येते व त्यानंतर तीव्र असा ताप येतो. हा ताप पाच-सहा दिवस असाच कमी जास्त होत राहतो. ताप 102 ते 103 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो.
  • हातापायांना सूज येते व खूप वेळा शरीरावरती दाने दाने (Spots) आढळून येतात.
  • या आजाराची लक्षणे कमीत कमी दहा ते बारा दिवस राहतात. या आजाराचे बरेच पेशंट पाहिल्यानंतर असे लक्षात आले की सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये या आजाराचा खूप जास्त त्रास होतो. नंतरच्या पाच सहा दिवसांमध्ये ताप हळूहळू कमी होऊन आजार बरा होतो.
  • तापाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या आजारात शरीरामधील पाचनक्रिया(Metabolism) खूप कमी होते,त्यामुळे खाल्लेले पचत नाही व त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते.

चिकनगुनिया ची तपासणी 

कुठल्याही आजाराच्या उपचारासाठी त्या आजाराची तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे असते, ज्यामुळे आपल्या हा आजार झाला आहे की नाही हे लक्षात येईल व आपण त्यावर उपचार घेऊ शकु.

चिकनगुनिया झालेल्या रुग्णांमध्ये सामान्यतः सीबीसी (CBC), आरटीपीसीआर (RTPCR), इएलएसए (ELSA), सीएचआयकेवी (ChikV) या तपासण्या केल्या जातात. या सर्व तपासण्या डॉक्टर रुग्णाच्या लक्षणांवरून ठरवतात यामध्ये काही तपासण्या वाढू किंवा कमी होऊ शकतात. म्हणून स्वतःहून या तपासण्या करू नये.

चिकनगुनिया व घ्यावयाची काळजी 

प्रत्येक आजार बरा होण्यासाठी काही ना काही उपाय असतात ते आपण प्रत्येक जणच करतो, परंतु आजार होण्याआधी त्या आजाराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. ज्यामुळे आपल्याला आजारच होऊ नये किंवा एक वेळ झाल्यास परत परत तो आजार आपल्याला होऊ नये. आता चिकनगुनिया संदर्भात काय काळजी घ्यावी ते आपण पाहू.

स्वच्छता – आपल्याला सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व माहीतच आहे, म्हणूनच आपल्या आसपास आजूबाजूच्या परिसरात आपण नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी घाण पाणी साठले असेल ज्यामध्ये मच्छर तयार होत असतील तर ते बाजूला काढणे किंवा सांडून देणे हे चिकनगुनिया रोखण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये औषधी फवारने हे देखील खूप गरजेचे आहे. जिथे स्वच्छता असते तिथे आजार खूप कमी प्रमाणात आढळून येतात.

खाण्यापिण्याकडे लक्ष देणे – आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे, बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन त्या वातावरणात कुठले अन्न योग्य आहे ते निवडून त्याचा आहारामध्ये समावेश करावा. खाण्यापिण्याच्या वस्तू या योग्य ठिकाणाहून व क्वालिटी तपासूनच घ्या. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. जास्त तळलेला आहार टाळा.

  • आजार अंगावर काढू नका – कुठलाही आजार असाच अंगावर काढू नये, आजाराची लक्षणे आढळून आल्यास साधे साधे घरगुती उपाय सुरू करा. त्यानंतर देखील बरे न वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
  • शरीरातील ताप कमी करण्यासाठी डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवावी. अद्रक आणि तुळशीचा चहा प्यावा.
  • कडू चिरायता नावाच्या औषध आयुर्वेदिक दुकानातून घ्यावे व त्याचे दोन थेंब पाण्यासोबत घ्यावे.
  • कडुलिंबाची कोवळी पाने चावून चावून खावीत, तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून आंघोळ करावी.
  • तुळस लवंग काळे मिरे आणि अजवाइन या गोष्टी पाण्यात टाकून त्याचा काढा करावा व प्यावा. शक्यतो पचनास हलके आहे असे अन्न खावे, बाहेरचे खाणे टाळावे. ताज्या फळांचा आहारात समावेश करावा.
  • वरील सर्व उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

म्हणूनच चिकनगुनिया होण्याची वाट न बघता आपल्याला हजार होऊच नये याची काळजी घेणे गरजेचे आहे जरी या आजारावर उपचार उपलब्ध असला तरी आजार होण्याआधीच आपण सावधानता आणि दक्षता बाळगावी. विशेष करून लहान मुलांनी आणि वयोवृद्ध व्यक्तींनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स