Health Tips : काही पोषक तत्व एकत्र केल्यावर आरोग्याला बरेच फायदे मिळतात. जसे की, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम, आयरन आणि व्हिटॅमिन सी इत्यादी. पण काही गोष्टी अशाही असतात ज्या एकत्र खाल्ल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. हे तर सगळ्यांनाच माहीत असेल की, दुधासोबत दह्याचं सेवन अजिबात करू नये. त्यासोबतच अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एकत्र अजिबात खाऊ नयेत. चला जाणून घेऊ त्याबाबत...
पराठे आणि दही - पराठे आणि दही सोबत खाण्याचं खूप चलन आहे. पराठ्यांमध्ये चरबी असते आणि दही चरबी पचवण्यात अडथळा आणतं. पण चपातीसोबत दही तुम्ही आरामात खाऊ शकता.
जेवण आणि चहा - जेवण केल्यावर चहा प्यायल्याने पचन चांगलं होतं असं काही लोकांना वाटतं. पण असं होत नाही. जेवल्यावर चहा प्यायले तर प्रभाव उलटा होतो. जेवण केल्यावर चहा प्याल तर पोट खराब होतं.
मासे आणि दही - मास्यांसोबत दही अजिबात खाऊ नये. दही थंड असतं आणि मासे गरम. दोन्ही सोबत खाल तर पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात आणि त्वचेची अॅलर्जीही होऊ शकते.
दूध आणि तळलेले पदार्थ - दुधासोबत तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. दुधातील अॅनिमल प्रोटीन तळलेल्या किंवा भाजलेल्या पदार्थांसोबत रिअॅक्ट होऊन आरोग्य बिघडवू शकतात. तसेच उडीद डाळ आणि तिळासोबतही दुधाचं सेवन करू नये.
फळं आणि दूध - दुधासोबत फळांचंही सेवन करू नये. दुधासोबत फळं खाल्ल्याने यातील कॅल्शिअम फळातील एंजाइम्सला शोषूण घेतं. अशात फळातून मिळणारं पोषण शरीराला मिळत नाही.