शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

ताप, सर्दी-खोकला, रोगांना बसेल आळा; आला पावसाळा अशी तब्येत सांभाळा...  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 2:14 PM

बदलत्या वातावरणाचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.

Health Tips For Rainy Season : बदलत्या वातावरणाचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये आपल्याला शरीराची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. विशेषत: पावसाळ्यात ताप, सर्दी-खोकला तसेच मलेरिया, डेंग्यू, त्वचेची अ‍ॅलर्जी यांसारखे आजार उद्भवतात. 

दरम्यान, अजून तरी पाऊस सुरू झालेला नसला तरी अनेकजण हवामान बदलाच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या देशभरात काही ठिकाणी मान्सूनचं आगमन झालं आहे तर काही ठिकाणी पावसाची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये अनेकजण ट्रिपला जायचे प्लॅन बनवतात. त्यात बाहेरचं खाणं आलंच. थंड वातावरणात गरमागरम वडापाव, भजींवर ताव मारणं कोणाला आवडत नाही. पण त्याचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. थंड, जिव्हाळ्याचा तसेच आनंददायी वाटणारा पावसाळा ऋतू आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. त्यामुळे या ऋतूमध्ये आजारांना दूर ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

इम्यूनिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे-

पावसाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये इम्यूनिटी बुस्टर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करावा. उदा. ब्रोकली,गाजर, हळद,आले-लसूण  या पदार्थांचा समोवश आहारात करावा. आले आणि लसूणमध्ये  अ‍ॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात ज्यामुळे सर्दी, खोकला तसेच ताप यांसारख्या आजारांना आळा बसतो. 

त्वचेची अशी घ्या काळजी-

मुख्यत: पावळ्याच्या सीझनमध्ये स्कीन अ‍ॅलर्जीच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी बाहेर पावसात जाऊन भिजणं टाळावं, त्याचबरोबर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. 

पाणी उकळून प्यावं-

या ऋतूमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पावसाळ्यात पाणी नेहमी उकळून, गाळूण प्यावं असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब, कावीळ यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmonsoonमोसमी पाऊसSkin Care Tipsत्वचेची काळजी