शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

रात्री जेवणानंतर लगेच ढाराढूर झोपता? जेवण आणि झोप यामध्ये किती अंतर असावे; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 1:31 PM

जेवल्यानंतर तुम्ही लगेचच झोपी जात असाल तर आजच ही सवय बदला नाहीतर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Health Tips : रोजची धावपळ आणि कामाचा थकवा त्यामुळे बऱ्याचदा काही लोकांना रात्री जेवण केल्यानंतर लगेचच झोपी जाण्याची सवय असते. झोप पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ते जेवण केल्यानंतर लगेच ढाराढूर झोपतात. मस्त जेवणावर ताव मारून खुशाल झोपायचं म्हणजे स्वर्गसुख असा त्यांचा समज आहे. रिपोर्टनुसार, असं करणं चुकीच आहेच शिवाय आपल्या आरोग्यावर त्याचे नळतपणे दुष्परिणाम होतात. 

तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेच झोप येणे किंवा झोपी जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. त्यामुळे पचनक्रियेचा वेग मंदावतो तसेच लठ्ठपणा वाढतो. 

या गंभीर समस्या उद्भवू शकतात-

१) पचनक्रिया कमजोर होते-

जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. शिवाय त्यामुळे अन्नाचे पचन मंद होते आणि पोटभर जेवून लगेच झोपल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. एवढेच नाही तर त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. 

२) अनिद्रा-

रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरात आम्लपित्त तयार होतं. त्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ होते. त्यामुळे आपली झोपमोड होऊ शकते. 

३) वजन वाढते-

शरीरातील कॅलरीज बर्न होत नसल्याने वजन वाढण्याची समस्या भेडसावते.आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार, रात्रीचे जेवण केल्यानंतर जवळपास अर्धा तास मोकळ्या हवेत फेरफटका मारावा. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. 

जेवणे आणि झोपणे यात नेमके किती तासांचे अंतर असावे ? 

न्यूट्रिशननिस्टच्या मते, रात्री जेवण केल्यानंतर ३ तासानंतरच झोपावे. तसेच विशेष म्हणज जर आपण हेव्ही म्हणजेच जास्तच तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर ३ तासांपूर्वी अजिबात झोपू नये.  तसेच जेवल्यानंतर काही वेळ वज्रासनात बसावे, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि आम्लपित्ताचा त्रास होत नाही. याचबरोबर रात्रीचे जेवण जरा हलके असावे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल