Benefits Of Afternoon Power Nap : ऑफिसच्या वेळेत दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येते. मात्र, असं असलं तरी कामाच्या ठिकाणी काही नॅप घेता येत नाही. तुमच्या बाबतीतही असंच काहीसं होतं? मग हे नक्की वाचा...
तुम्हाला माहितीये का दुपारची पॉवर नॅप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.ऑफिसचे काम, दिवसभराची धावपळ आणि ताण-तणाव हलका करण्यासाठी काही मिनिटांचा पॉवर नॅप खूप गरजेचा असतो. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, १०-२० मिनिटांची झोप आपली एकाग्रता आणि सतर्कता वाढवण्यास मदत करते. यामुळे आपण उर्वरित दिवशी जास्त प्रोडक्टिव्ह काम करू शकतो.
पॉवरनॅपमुळे शरीरातील हार्मोन्स संतुलन राखलं जातं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मानवी शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या हार्मोन्सची या पॉवरनॅपमुळे निर्मिती होते.
हृदयाचे आरोग्य सुधारेल-
दररोज पॉवर नॅप घेतल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. जे नियमितपणे पॉवर नॅप घेतात त्यांना हृदयाच्या तक्रारी कमी होतात. कारण झोप ताण-तणाव कमी करते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
स्मरणशक्ती वाढते-
पॉवर नॅपमध्ये स्मरणशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. झोपेच्या वेळी आपला मेंदू माहिती गोळा करणे आणि साठवून ठेवणे ही काम करतो. मुड सुधारतो. ताण-तणाव, चिडचिड कमी कमी होते. त्यामुळे सोशल आणि पर्सनल लाइफ सुधारते.
पॉवर नॅपची वेळ किती असावी?
साधारण पॉवर नॅपची वेळ १०-२० मिनिटे असायला हवी. यापेक्षा जास्त झोप घेतल्यास थकवा जाणवतो जागा- पॉवर नॅप घेण्यासाठी एक आरामदायक आणि शांत जागा निवडा पॉवर नॅप घेण्याची योग्य वेळ दुपारी १-३ च्या मध्ये आहे.