HEALTH TIPS : केस गळतीची समस्या आहे, तर रोज ‘हे’ खा !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 7:32 AM
अनेक उपाय करुनही केस गळती थांबत नाही. तर करा हा घरगुती उपाय
-Ravindra Moreकेस गळतीच्या समस्येने आज प्रत्येकजण त्रस्त आहेत. अनेक उपाय करुनही केस गळती थांबत नाही. मात्र आज आम्ही आपणास असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याने या समस्येपासून कायमचा आराम मिळेल. मूग दाळीचा समावेश वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. मूग दाळपासून खिचडी, मूग दाळचा लाडू, मूगदाळीचा हलवा आणि अन्य प्रकारचे स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ तयार केले जातात. सर्व प्रकारच्या दाळींमध्ये सर्वात पौष्टिक मूग दाळ आहे. यात विटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात आहे. सोबतच यात पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियमदेखील बऱ्याच प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे मूग केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. जर मूग अंकुरित (स्प्राउट) केल्यानंतर सेवन केले तर केस गळतीची समस्या नष्ट होते. शिवाय केस दाट आणि चमकदार तसचे मजबूतही होतात. अंकुरित मूगाचे फायदेजर आपण अंकुरित (स्प्राउट) मूगाचे सेवन के ले तर शरीराला ३० कॅलरी आणि १ ग्रॅम फॅट मिळतो. अंकुरित मूग दाळीत मॅग्निशियम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, विटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फॉस्फोरस, आयर्न, विटॅमिन बी-६, थायमिन आणि प्रोटीन असते. हे तत्त्व शरीरासाठी अत्यावश्यक असतात. ज्यामुळे शरीराला पोषक तत्त्व मिळतात आणि केस गळती थांबते.