Health Tips : हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे. लोकांना कच्चे मटर खाणे तर पसंत आहेच. पण अनेकांना हे माहीत नसतं की, यात किती आरोग्यदायी तत्त्व आहेत. खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण जास्त मटार खाणेही चांगलं नाही. कारण याने शरीरात गॅस तयार होते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हिवाळ्यात याचं संतुलित सेवन केलं तर फायदा होऊ शकतो.
वजन कमी करण्यास मदत
तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर मटार खाणे फायदेशीर ठरु शकतं. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. सोबतच यात कॅलरी आणि फॅटही कमी असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. सकाळी नाश्त्यात याचा समावेश केला तर यातील फायबरमुळे दिवसभर भरपूर एनर्जी मिळते.
हाडे होतात मजबूत
वेगवेगळ्या शोधातून हे समोर आलं आहे की, मटारमध्ये व्हिटॅमिन 'के' भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील हाडांना मजबूत करतात. त्यासोबतच याने हाडांमध्ये होणाऱ्या ऑस्टियोपोसिसचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. याचा अर्थ मटार हाडांच्या सुरक्षेसाठी फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं
हिरवे मटार आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. यात काही असे गुण असतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल स्तर वाढत नाही. सोबतच शरीरात ट्रायग्लिसराइड्सचा स्तरही मटार वाढू देत नाही. याचे सेवन केल्याने रक्तात कोलेस्ट्रॉल स्तर नियंत्रित राहतो आणि आपला अनेक आजारांपासून बचाव होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतं, ज्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून लढण्यास मदत मिळते.
हृदयरोगांपासून बचाव
हृदयरोगांनी ग्रस्त लोकांसाठी मटारचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करु शकतो. मटारमध्ये सूज कमी करणारे अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात. याने हृदय निरोगी राहतं.
केसगळती होते कमी
मटारमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे केसगळती रोखली जाऊ शकते. तसेच केस मुलायम आणि मजबूत होण्यासही मदत मिळते. त्यासोबतच यात असलेल्या व्हिटॅमिन बी ६, बी १२ आणि फॉलिक अॅसिड लाल रक्तपेशी तयार करण्यास फायदेशीर ठरतात. याने केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात.