आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचं भाग म्हणजे आपलं पोट आहे. पोटातूनच अनेक आजारांची सुरूवात होते. आपण जे काही खातो ते आपल्या पोटासाठी गरजेचं असतं. त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि पोटातील ही तयार झालेली ऊर्जा पुढे ट्रान्सफर होते.
पोटातील जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अॅसिड करत असते. ही एक असी पिशवी आहे ज्यात आपण खाल्लेलं सगळं जातं. यात जास्तीत जास्त ३५० ग्रॅम जेवण बसू शकतं.
आता जठरात काय होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जठरात जेव्हा अन्न पोहोचतं. तेव्हा नैसर्गिकपणे यात आग पेटते. याला जठराग्नी म्हणतात. जसेही तुम्ही तोंडात पहिला घास घेता, जठरात अग्नी पेटते. अन्न पचन होईपर्यंत ही अग्नी पेटलेली असते. यामुळे अन्न पचण्यास मदत होते.
पण जेव्हा तुम्ही जेवताना किंवा जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिता तेव्हा ही अग्नी विझते. अर्थातच ही अग्नी विझली तर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार नाही. तुमची पचनक्रियाच थांबते. हे नेहमी लक्षात ठेवा की, अन्न पचताना आपल्या पोटात दोनच क्रिया होतात. एक म्हणजे digestion आणि दुसरी आहे fermentation. fermentation चा अर्थ सडणे असा होतो.
आयुर्वेदानुसार, अग्नीमुळेच अन्न पचन होणार, तेव्हाच त्याचा रस तयार होईल. या रसामुळेच मांस, मज्जा, रक्त, वीर्य, हाडे, मल-मूत्र तयार होतील. सर्वात शेवटी तयार होईल विष्ठा. हे तेव्हाच होईल जेव्हा अन्न पचेल. तसं नाही झालं तर वेगवेगळ्या समस्या होतील. जेवणानंतर जर लगेच पाणी प्यायलात तर जठराग्नी पेटणार नाही आणि पोटतील अन्न तसंच सडणार. सडल्यानंतर त्या विषारी पदार्थ तयार होतील.
अन्न पोटात सडल्यावर सर्वात आधी तयार होणारा विषारी पदार्थ म्हणजे यूरिक अॅसिड. अनेकदा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सांगता की, मला गुडघेदुखीचा त्रास होतोय, माझे खांदे-कंबर दुखत आहे. तेव्हा डॉक्टरही हेच सांगतात की, युरिक अॅसिड वाढलंय. युरिक अॅसिड जर वेळीच कंट्रोल केलं नाही तर तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही. त्यामुळे पचनक्रिया चांगली व्हावी यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे.