फुफ्फुसं निरोगी नसतील तर तुम्ही कितीही ठरवले तरी निरोही राहू शकत नाही. जर तुम्हाला फुफ्फुसांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत असेल तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. तसंच श्वसनाच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. व्यस्त जीवनशैलीत फुफ्फुसांना वेगवेगळ्या कारणांमुळे नुकसान पोहोचत असते. आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांचं नुकसान होण्याची कारणं सांगणार आहोत.
छातीत गारवा येणं
सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य वाटत असलेल्या समस्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळे छातीचा भाग आतून गार होतो. नाक, घसा यात काहीही समस्या उद्भवल्यास थेट फुफ्फुसांवर परिमाण होत असतो. जेव्हा छातीमध्ये जास्त प्रमाणात गारवा तयार होतो तेव्हा नुकसानकारक ठरू शकतं.
डॉक्टर या स्थीतीला ब्रोंकाइटिस असं म्हणतात. शेकडो व्हायरस हे सामन्य सर्दी, खोकल्याच्या त्रासाचे कारण ठरू शकतात. अशा स्थितीत छातीत कफ जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे खोकला होतो. ही समस्या दूर करण्यासाठी गरम पदार्थ, आयुर्वेदिक चहा, आलं घातलेला चहा. हळदीचे दुध, गरम सुप यांचे सेवन करायला हवे. जेणेकरून फुफ्फुसं चांगली राहतील.
अस्थमा
फुफ्फुसांमध्ये सुज आल्यामुळे हा आजार उद्भवतो. या आजाराने पिडीत असलेल्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होणं, खोकला येणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत इन्हेलरचा वापर करून जास्तश्वास घेण्याचा प्रयत्न करा.
सीओपीडी (क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज)
सीओपीडी हा आजार साधारणपणे जास्त काळ धुम्रपान केल्यामुळे उद्भवतो. फुफ्फुसांमध्ये हवेच्या लहान लहान पिशव्या असतात त्यांना एल्वियोली असं म्हणतात. या पिशव्या आजारात या पूर्णपणे नष्ट होतात. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. धुम्रपानाची सवय सोडल्यास या आजारापासून लांब राहता येऊ शकतं.
इन्फ्लुएंजा
इन्फ्लुएंजा व्हायरसमुळे सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसू येतात. कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतरही अशीच लक्षणं दिसून येतात. त्यामुळे फुफ्फुसांना नुकसान पोहोचतं. या समस्येपासून वाचण्यासाठी गरम पाणी आणि काढ्याचे सेवन करायला हवे.
Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!
coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना