शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

तुमचीसुद्धा इम्यूनिटी कमी झालीये का? कोरोनाशी लढण्यासाठी हा आहे इम्युनिटी वाढवण्याचा सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 10:01 AM

Health Tips : रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यास शरीराला कोणत्याही आजारापासून लांब ठेवता येऊ शकतं.

कोरोनाच्या माहामारीत लोक वेगवेगळे उपाय करून स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.  सध्याच्या स्थितीत लोकांचा सगळ्यात जास्त जोर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यावर आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यास शरीराला कोणत्याही आजारापासून लांब ठेवता येऊ शकतं. डॉक्टर शुचिन बजाज आणि डॉ अमरिंदर सिंह यांनी डॉ. यांनी अमर उजालाशी बोलताना काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. 

कमकुवत इम्यूनिटी कशी ओळखायची.

लोकांना त्यांच्या प्रतिकारशक्तीची पातळी जाणून घेण्याची इच्छा आहे. आमची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे की मजबूत हे कसे जाणून घ्यावे, या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. अमरिंदर सिंह म्हणतात की, ''आपण घरी सहजतेने आपल्या प्रतिकारशक्तीची पातळी तपासू शकता. जखम आणि जखमांवर उशिरा बरे होणे, वारंवार अतिसार किंवा गॅस, निमोनिया आणि सर्दी सारख्या वारंवार संक्रमण हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकते.''

कमकुवत इम्यूनिटी असल्यास काय करायचं?

ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांनी व्हायरल लोड कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या आणि गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जर व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचू द्यायचा नसेल तर योगा आणि व्यायामाचा वापर करा जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. फूड प्लेटमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यांचा समावेश करा, यामुळे शरीराला फायदा होतो.

इम्यूनिटी कशी वाढवायची?

डॉ.अमरिंदरसिंग स्पष्ट करतात की रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. मीठ, मैदा आणि साखर कमीत कमी  खाण्याचा प्रयत्न करा. गोंधळ न करता आहारात भाजीचे सेवन वाढवा. योग आणि व्यायाम नियमितपणे करा आणि 6 ते 8 तास झोपा.

या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

काय आहे हेमोफीलिया, या आजाराच्या नावानं लोक का घाबरतात?

योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरी राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला