शरीराला निरोगी आणि चांगलं ठेवण्यासाठी रोजच्या सवयींकडे लक्ष देणं फार महत्वाचं असतं. कारण सामान्य वाटत असलेल्या वाईट सवयी गंभीर आजारांचं कारण ठरू शकतात. अनेकांना सकाळचा नाष्ता उशीरा करण्याची सवय असते. सकाळचा नाष्ता किती गरजेचा आहे हे काही वेगळं सांगायला नको. पण अनेकजण उठल्यानंतर बराचवेळ थांबून नाष्ता करतात. घरोघरच्या महिला कामामुळे उभ्या उभ्यानं नाष्ता करतात, त्याचीही वेळ ठरलेली नसते.
नुकत्यात समोर आलेल्या अभ्यासानुसार नाष्ता वेळेवर न करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. इंडोक्राईन सोसायटीकडून एक वर्चुअल कॉन्फ्रेंस ईएनडीओ २०२१ मध्ये प्रस्तृत करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार सकाळी उशीरा नाष्ता करत असलेल्यांन टाईप २ डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो. अमेरिकेतील एका अभ्यासाच्या आधारावर तज्ज्ञांनी हा रिपोर्ट तयार केला आहे.
शिकागो युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी या अध्ययनादरम्यान १०५७४ लोकांच्या सवयी, डाएटचा अभ्यास केला होता. यादरम्यान तज्ज्ञ हे ओळखण्याचा प्रयत्न करत होते की, रक्ताच्या साखरेच्या पातळीवर नाष्त्याचा कसा परिणाम होतो. तज्ज्ञांना दिसून आलं की, जे लोक सकाळी लवकर नाष्ता करतात, त्याच्या शरीरातील साखरेचं प्रमाण तसंच इन्सुलिन नियंत्रणात असतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळचा नाष्ता पौष्टिक असायला हवा. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. याशिवाय शरीराला योग्य प्रमाणात उर्जाही मिळते. सकाळी लवकर नाष्ता केल्यानं मेटाबॉलिज्मही व्यवस्थित राहतो. CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
नाष्ता करण्याची योग्यवेळ कोणती?
या अभ्यासात तज्ज्ञांना दिसून आलं की, जे लोक सकाळी ८:३० च्या आधी नाष्ता करून घेतात. त्याच्यात इंसुलिन रेजिस्टेंस कमी प्रमाणात असते. असं म्हटलं जात आहे की, अशा लोकांमध्ये मधूमेहाचा धोका कमी असतो. जे लोक उपवास ठेवतात ते इन्सुलिनप्रती कमी संवेदनशील असतात, असं या संशोधनात दिसून आलं. कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा