आपण कधीही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, विशेषत: जेव्हा आपण वयाची तीशी पार करता. कोणत्याही रोगाचे वेळेवर निदान केल्यास ताबडतोब उपचार करता येतात. परंतु आपल्यापैकी बरेच लोक आहेत जे वर्षातून कधीच डॉक्टरकडे जात नाहीत. वर्षातून एकदा आपल्या शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे. कारण वय जसजसे वाढत जाते तसतसे आपले शरीर देखील म्हातारे होते आणि पूर्वीचे कार्य कमी करते. आज आम्ही आपल्याला काही महत्त्वपूर्ण वैद्यकीय चाचण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या प्रत्येकाने 30 वर्षानंतर करायलाच हव्यात. जेणेकरून तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता.
कम्पलीट ब्लड काउंट (CBC)
अशक्तपणा, संसर्ग, कर्करोग अशा काही प्रकाराच्या आजारांबाबत माहिती मिळवण्यासाठी या चाचणीसाठी उपयोग होतो. हे विशेषतः भारतीय महिलांसाठी महत्वाचे आहे. कारण आपल्यातील बहुतेक लोक अशक्तपणा, अनिमियामुळे पीडित आहेत. सीबीसी ठीक असल्यास वर्षातून एकदा त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.
ब्लड शुगर टेस्ट
ही चाचणी १२ तास उपाशी राहिल्यानंतर डायबिटीसबाबत माहिती मिळवण्यासाठी केली जाते. जर रीडिंग <99 असेल तर सामान्य स्थिती असते. १०० किंवा ११० रिडिंग असते तेव्हा प्री डायबिटीसचे संकेत असतात. ११० पेक्षा जास्त असल्यास मधुमेहाची समस्या जाणवू शकते.
पॅम स्मिअर
ही चाचणी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी केली जाते, जी अचूक सूचक मानली जाते. हे रक्त तपासणी, एकूण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसरायड्स, एचडीएल आणि एलडीएल पातळी मोजण्यासाठी वापरले जाते. जर आपण लठ्ठपणाच्या श्रेणीमध्ये येत असाल किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्यास हृदयविकाराचा किंवा डायबिटीस असेल तर आपण वर्षातून एकदा ही चाचणी करून घ्यावी.
ईसीजी
वयाच्या 35 व्या वर्षानंतर ही चाचणी करून घेण्यास सूचविले जाते. हे विशेषत: हृदयातील रक्तवाहिन्यांची लक्षणे, अडथळा, ऑक्सिजनची कमतरता, छातीत तीव्र वेदना, दम लागणे किंवा हृदयविकाराचा झटका ही लक्षणं शोधण्यासाठी ईसीजी चाचणी केली जाते.
लिव्हर इंन्फेक्शन
लिव्हरची स्थिती तपासण्यासाठी ही वार्षिक चाचणी आहे. जर अल्कोहोलचे सेवन जास्त प्रमाणात करत असाल किंवा आपल्याला फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस सी आणि बी सारखा आजार असू शकतो म्हणून वेळीच ही चाचणी करून घ्या.
थायरॉइड फंक्शन टेस्ट
अंडेरेक्टिव्ह (हायपोथायरॉईडीझम) किंवा ओव्हरएक्टिव थायरॉईड (हायपरथायरॉईडीझम) शोधण्यात या रक्त चाचण्या महत्त्वपूर्ण आहेत. आपली थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करत आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी टी 3, टी आरयू, टी 4, टीएसएच चाचणी करण्यास सांगितले जाते. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा
व्हिटामीन डी च्या कमतरतेची चाचणी
व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे आपल्या हाडांना आणखी नुकसान होऊ शकते. यामुळे आपल्याला ऑस्टिओपोरोसिसचा धोका देखील वाढवू शकता. जर रिडींग 30 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.चिंताजनक! लसीकरणाला सुरूवात होताच कोरोना लसीबाबत चीनी वैज्ञानिकांचा खुलासा
(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहीती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )