दैनंदिन जीवन जगत असताना आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवत असतात. बडीशोप खाण्याचे अनेक फायदे आहेत. घराघरात जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी किंवा मसाल्यांच्या पदार्थांमध्ये बडीशोपचा वापर केला जातो. तुम्ही कधी विचार केलाय का, आरोग्याच्या दृष्टीनं बडीशोपेचे काय फायदे होतात. रोज बडीशोप घातलेल्या दुधाचं सेवन केल्यानं तुम्ही आरोग्यासंबंधी अनेक समस्यांपासून लांब राहू शकता. यामुळे दुधाला चवही येते आणि शरीरही चांगलं राहतं. दूध नेहमीच सगळ्यांच्या स्वयंपाक घरात असतं. बडीशोप अगदी कमीत कमी रुपयांत तुम्ही आणू शकता. चला तर मग जाणून घेऊया बडीशोप घातलेल्या दुधाच्या सेवानं शरीराला कोणते फायदे होतात.
पचनक्रिया व्यवस्थित राहते
दूधात बडीशोप घालून त्याचे सेवन केल्यास पोटासंबंधी समस्या दूर होतात. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी दूध आणि बडीशोपचं सेवन रोज करायला हवं. रोजच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. गॅस आणि एसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. पोट साफ होण्याची क्रियाही व्यवस्थित राहते.
स्मरणशक्ती चांगली राहते
रोज एक ग्लास बडीशोप घातलेल्या दुधाचं सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होतो. मेंदूला चालना मिळते. तसंच मूड नेहमी फ्रेश राहतो.
डोळ्यांच्या समस्या दूर होतात
बडीशोप घातलेलं दूध प्यायल्यानं डोळ्यांच्या समस्या दूर होतात. डोळ्यांमधून पाणी बाहेर येणं, जळजळ होणं अशा समस्यांपासून लांब राहता येतं.
मासिक पाळींतील वेदना
बडीशोप घातलेल्या दुधाचं सेवन केल्यास मासिक पाळीतील वेदना कमी होतात. याव्यतिरिक्त गुळ आणि बडिशोपचंही सेवन तुम्ही करू शकता. तुम्हाला जर मुत्रमार्गात जळजळ होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं युरीन इन्फेक्शन असल्यास बडीशेप खाल्यानं लगेच आराम मिळेल.
खोकल्याची समस्या दूर होते
खोकला झाल्यास जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप मधात किंवा दूधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल. बडीशोप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं
तुम्हाला कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवायची असेल तर जेवणाआधी जवळजवळ ३० मिनिटं एक चमचा बडीशेप खावी. बडीशेप कॉलेस्ट्रॉल लेव्हल आटोक्यात ठेवते. सकाळी उठल्यानंतर दुधासोबत बडीशोपचं सेवन करणंही कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
हे पण वाचा
डास चावल्यानंतर खाज का येते? कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव
खुशखबर! ३ महिन्यानंतर आपोआप चांगली होताहेत कोरोनामुळे संक्रमित झालेली फुफ्फुसं, तज्ज्ञांचा दावा