हिवाळ्यात गाजर काकडी, बीट, वाटाणे मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होतात. तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल किंवा हेल्दी, फिट राहण्यासाठी डाएट करायचं असेल तर हा कालावधी उत्तम आहे. रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक पोषक तत्व आहेत. आज आम्ही तुम्हाला बीटाच्या सेवाने शरीराला कोणते फायदे होतात याबाबत सांगणार आहोत.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटाचा 1-1 कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होता. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्या.
पोट साफ होण्यास मदत होते
बीटाचे सेवन केल्याने शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
सांधेदुखी कमी होते
बीटामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. बीटामध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते. तुम्ही ज्यूस, भाजी, सॅलेडमध्ये बीटाचा समावेश करू शकता.
डायबिटीस नियंत्रणात राहते
डायबिटीस असलेले लोक बीटाचे सेवन बिंधास्त करू शकतात कारण त्यामुळे ब्लड शुगर लेवलसुध्दा वाढत नाही बीटामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि हे फॅट फ्री असते.
एनिमीयाची समस्या कमी होते
ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता असते. बीटाच्या सेववाने ही कमरता भरून काढता येऊ शकते. त्यासाठी तुम्ही जेवताना बीटाचे काप किवा बीटाचा रस प्यायला सुरूवात करा. याशिवाय बीटाच्या रसात फ्लेवोनोइड्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
थंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा? तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती
याशिवाय त्वचेवर बीटाचा वापर करण्यासाठी एलोवेरा जेल आणि २ चमचे व्हिटामीन ई च्या कॅप्सूल आणि बदामाचं तेल एकत्र करा. त्यात एक साल काढलेल्या बीटाचा घट्टरस घाला . हे मिश्रण तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेऊन द्या. हे मिश्रण १५ दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये राहू शकतं. ही क्रिम आपल्या हातांनी त्वचेवर गोलाकार फिरवा.
घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय
हिवाळ्यात चेहरा खराब होऊ नये म्हणून इतर केमिकल्सयुक्त क्रिम वापरण्यापेक्षा बीटाच्या घरगुती क्रिमचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा गुलाबी दिसेल तसंच मऊ आणि मुलायम दिसेल. याच मिश्रणात व्हिनेगर घालून जर तुम्ही पेस्ट तयार केली आणि याचा वापर केसांवर केला तर कोंडा होण्याची समस्या दूर होईल.