शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

तुम्हाला माहीतही नसतील नारळ पाण्याचे  हे ७ दुष्परिणाम; डॉक्टरांनी सांगितली सेवनाची योग्य वेळ

By manali.bagul | Published: February 05, 2021 3:35 PM

Disadvantages of coconut water : कमी कॅलरीज आणि कमी फॅट फूल आहार म्हणून नारळ पाण्याचे सेवन केलं जातं. कोणीही आजारी असल्यास या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक नारळपाणी घेऊन जातात. पण नारळपाणी चुकीच्यावेळी प्यायल्यानं नुकसानाचाही सामना करावा लागू शकतो.

भारतात मोठ्या प्रमाणावर लोक नारळ पाण्याचे सेवन करतात. साधारणपणे नारळपाणी हे चवीला गोड लागतं. त्या ठिकाणच्या मातीप्रमाणे नारळ पाण्याची चव असते. समुद्राच्या आजूबाजूला नारळाची झाडं असतील तर याची चव काही प्रमाणात  खारट असते. नारळाचे उत्पादन तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कमी कॅलरीज आणि कमी फॅट फूल आहार म्हणून नारळ पाण्याचे सेवन केलं जातं. कोणीही आजारी असल्यास या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक नारळपाणी घेऊन जातात.

पण नारळपाणी चुकीच्यावेळी प्यायल्यानं नुकसानाचाही सामना करावा लागू शकतो. त्यासाठी आम्ही आज पाणी कधी प्यायचं, कधी पिऊ नये याबाबत सांगणार आहोत. दिल्लीतील डायटीशियन शीला सहरावत यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

नारळपाण्याचे दुष्परिणाम

जर शरीरात नारळाच्या पाण्याचे प्रमाण जास्त वाढले तर पोटाच्या समस्येने ग्रस्त लोकांना अतिसाराची समस्या उद्भवू शकते अशा परिस्थितीत, कमी प्रमाणात सेवन करणे चांगले उत्तम ठरेल.

ज्या लोकांचे शरीर थंड असते. त्यांना नारळपाण्याच्या सेवनानं जास्त त्रास होऊ शकतो. कारण नारळ पाण्यामुळे शरीराला अधिक शीतलता मिळते. 

लक्षात घ्या की नारळ पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत, जे लोक उच्च रक्तदाबासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतात, नारळपाण्याचे सेवन केल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नारळपाण्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात घ्या की जे लोक नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांना वारंवार लघवी करावी लागते.

ज्या लोकांना मूत्रपिंडाचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना किडनीचा आजार आहे त्यांनी आहारात नारळपाणी घेण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही लोकांना नारळपाण्याच्या पाण्यामुळे पोटात गोळा येण्याची समस्या उद्भवू शकते.

 तंबाखू खात नसाल तरीही 'या' ५ कारणांमळे होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर, वेळीच सावध व्हा

जर आपणास कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया  करायची असेल तर त्यापूर्वी कमीतकमी 2 आठवडे नारळाच्या पाण्याचे सेवन करणे थांबवा. अन्यथा, शस्त्रक्रिये दरम्यान किंवा नंतर रक्तदाब नियंत्रित करण्यात समस्या येऊ शकते.

काही लोकांना सवय असते की ते व्यायामानंतर नारळाच्या पाण्याचे सेवन करतात, परंतु त्यामध्ये सोडियम कमी आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अशा परिस्थितीत, व्यायामानंतर नारळ पाण्याने आपली तहान शांत करण्याऐवजी आपण साधे पाणी वापरावे. कारण नारळ पाण्यापेक्षा साध्या पाण्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते.

सावधान! जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा हीच चूक करत असाल; तर कितीही पौष्टीक खा, होणार नाही फायदा 

नारळपाणी कधी प्यावं?

एका वेळी खूप जास्त प्रमाणात नारळपाणी पिऊ नये, पचायला जड असणा-या पदार्थांबरोबर पिऊ नये, एका दिवशी एका नारळापेक्षा जास्त टाळा. वजन कमी करणं, शरीराची चयापचय गती वाढवणं यासाठी नारळपाणी सकाळी उपाशीपोटी प्यावं. गर्भवती स्त्रियांना सकाळी होणारी मळमळ, उलटी यात घोट घोट पिण्यासाठी द्यावं, पण प्रमाण कमी असावं.

नारळ आणून त्यातलं पाणी फ्रीजमध्ये ठेवून दोन-तीन दिवस पुरवून वापरू नये. शिळं नारळपाणी पचण्यास जड होतं. एकदम 250 मिली एका व्यक्तीनं न पिता किमान दोन जणांनी प्यावं म्हणजे जड होत नाही.  नारळपाणी प्यायल्यानं काहीजणांना जुलाबही होतात. त्यांनी मात्र नारळपाणी पिऊच नये.

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न