दह्यात असलेले तत्व शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर असतात. दही हे प्रो-बायोटीक फूड कॅल्शिअमने भरपूर असतं. कॅल्शिअममुळे दात आणि हाडांना मजबूती मिळते. कॅल्शिअमसोबतच दह्यात अनेक पोषक तत्वे असतात त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं.
1) रोग प्रतिकारक शक्ती : दररोज एक चमचा दही खाल्ल्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे वेगवेगळ्या आजारांविरोधात तुम्हाला लढण्याची ताकद मिळते.
2) दातांसाठी फायदेशीर : दही दातांसाठी फार फायदेशीर असतं. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम आणि फॉस्फोरस असतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.
3) वजन घटवण्यास मदत : दह्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असतं. हे एक असं तत्व आहे ज्यामुळे शरीर फुगण्यासा प्रतिबंध होतो. याने वजन वाढत नाही.
4) तणाव कमी करण्यास मदत : दही खाण्याचा संबंध सरळ प्रभाव डोक्यावर होतो. तुम्हाला हे जाणून घेण्यास आनंद होईल की, दही सेवन करणाऱ्यांना तणावाचा कमी सामना करावा लागतो. त्यामुळे तज्ज्ञ रोज दही खाण्याचा सल्ला देतात.
5) ऊर्जा मिळेत : जर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर दररोज एक वाटी दही सेवन करा. दही शरीराला हायड्रेटेड करुन नवीन ऊर्जा देतं.