शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

Headache warning sign : 'या' प्रकारच्या डोकेदुखीला सामान्य समजणं ठरतंय गंभीर आजाराचं कारण, जाणून घ्या ५ प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 6:23 PM

Health Tips in Marathi : जर डोकेदुखीमुळे तुमची झोप उडत असेल तर हा क्लस्टर हेडेकचा प्रकार असू शकतो. या प्रकारच्या वेदना २० ते ५० वर्ष वयोगटातील लोकांना होतात.

डोकेदुखी ही सामान्य समस्या असून या आजारानं जास्तीत जास्त लोक हे ग्रासलेले असतात. गंभीर स्थितीत डॉक्टरांकडे जाण्याची वेळसुद्धा येऊ शकते. दैनंदिन जीवन जगत असताना जेवणाच्या वेळा चुकणं, घाईत असणं कौटुंबिक, कार्यालयीन ताण अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे डोकं दुखतं. आज आम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होऊ शकतात. तसंच डोकं दुखू नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत सांगणार आहोत.

मायग्रेन क्लस्टर डोकेदुखी

ताणतणावमुळे संपूर्ण डोक्यात  वेदना होतात. पण मायग्रेनमध्ये फक्त डोक्याच्या एकाच बाजूला वेदना जाणवतात. याव्यतिरिक्त  उलटी होणं,  अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं दिसून येतात. जर डोकेदुखीमुळे तुमची झोप उडत असेल तर हा क्लस्टर हेडेकचा प्रकार असू शकतो. या प्रकारच्या वेदना २० ते ५० वर्ष वयोगटातील लोकांना होतात. याव्यतिरिक्त उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर, स्लीप एपिनिया आणि ब्रेन ट्यूमरमुळेही  डोकेदुखीच्या वेदना जाणवतात.

ताप, मानदुखीसह डोकेदुखी

ताप, मानदुखी, इंसेफएलाईटीस किंवा मेनिन्जाईटीसचं  कारण ठरू शकतं. या आजारात  मेंदूच्या मेनिन्जाइटिस मेंब्रेनला सुज येते. गंभीर इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. या प्रकारची डोकेदुखी जीवघेणीसुद्धा ठरू शकते. एंटीबायोटिक औषधांच्या सेवनानं या प्रकारच्या डोकेदुखीचे उपचार केले जाऊ शकतात.

थंडरक्लॅप डोकेदुखी

थंडरक्लॅप डोकेदुखी अचानक होत असलेल्या वेदना आहेत. ६० सेकंदापेक्षा कमी वेळात ही डोकेदुखीची समस्या उद्भवते.  धमन्यांना नुकसान पोहोचणं, स्ट्रोक किंवा जखम झाल्यानंतर या प्रकारच्या वेदना जाणवतात. उलटी होणं, बेशुद्ध होणं, हायपरटेंशनमुळे अशा प्रकारच्या वेदना जाणवतात. 

डोळ्यांमुळे  होणारी डोकेदुखी

अनेकदा डोळ्यांमुळे मायग्रेनच्या त्रासाचा सामना करावा लागतो.  त्यामुळे  दृष्टी कमी होऊ शकते. तुम्हालाही डोळ्यांच्या धुसरपणााबाबत तक्रार असल्यास  त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्या. 

CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं.....

सामान्य डोकेदुखीची कारणं

रोजचा प्रवास करणं, खाण्यापिण्यातील बदल, झोप पूर्ण न होणं, जास्तवेळ स्किन समोर पाहणं, थकवा, मेनोपॉज अशा व वेगवेगळ्या कारणांमुळे डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. सामान्य डोकेदुखी पेनकिलर खाल्ल्यानं कमीत कमी वेळेत बरी होऊ शकते. अन्य गंभीर लक्षणं दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य