दरवर्षी ९ लाखांपेक्षा जास्त लोकांना लोकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागतो. नेहमी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर बीपी तपासून पाहतात तेव्हा 120/85 mm Hg हा सामान्य स्थितीतील बीपी असतो. अनेकदा ताण तणावामुळे किंवा अनियमीत, व्यस्त जीवनशैलीमुळे लो बीपी किंवा हाय बीपीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. गंभीर परिणाम झाल्यास शारीरिक स्थिती खालावते. आज आम्ही तुम्हाला आहारतज्ज्ञ स्वाती बाथवाल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेल्या उपायांबाबत सांगणार आहोत.
१२० म्हणजे पहिल्या आकड्याला सिस्टोलिक असं म्हणतात. दुसरा आकडा ८५ ज्याला डायस्टोलिक म्हणतात. या दोन्ही आकड्याचे काम वेगवेगळे असते. हृदयातील मासपेशी आकुंचन पावल्यानंतर धमन्यामधील ब्लड पंप होते. एका निरोगी व्यक्तीचे सिस्टोलिक ब्लड प्रेशर ९० ते १२० मिलिमीटरचे असते. डायस्टोलिकचे ब्लड प्रेशर ६० ते ८० मिमीपर्यंत असायला हवे. १४०/९० पेक्षा जास्त बीपी असल्यास हायपरटेंसिव्ह किंवा हाय ब्लडप्रेशरची समस्या उद्भवते. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर हृदयाच्या मासपेशी, डोळे, किडन्यांना नुकसान पोहोचतं अनेकदा रक्तस्त्रावही होतो.
ब्लड प्रेशर वाढण्याची कारणं
मीठात ४० टक्के सोडियम आणि ६० टक्के क्लोराईड असतं. जेव्हा तुम्ही जेवणात जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करता तेव्हा शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जास्त मिठात शिजवलेल्या अन्नाचे सेवन केल्यानंतर तीन तासांनी तुमचा बीपी वाढायला सुरूवात होते. म्हणून आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात १५०० mg पेक्षा अधिक सोडीयमच सेवन करून नये.
पॅक फूड खाल्यानं बीपीच्या समस्या उद्भवण्याचा धोका दुप्पटीनं वाढतो. कारण त्यात जास्त प्रमाणत मीठाचा समावेश असतो. याव्यतिरिक्त जास्त तेलयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू नका. मीठाचे सेवन कमी प्रमाणात केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
शरीरातील मीठाचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे उपाय
सतत पाणी प्या, शरीराला हायड्रेट ठेवा.जेवणा वरून मीठ घेणं बंद करा. बाहेरून आणलेले सॉस, चटणी वापरण्यापेक्षा घरच्याघरी तयार करण्यात आलेल्या चटणी आणि सॉसचा आहारात समावेश करा. जेवणात जास्तीत जास्त कोथिंबीर, पालक, पुदिना या पदार्थांचा समावेश करा. सकाळी गरम पाणी प्या. यामुळे ब्लड फ्लो आणि सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. तसेच हे ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत करतं.
अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन
साखर आणि मीठाचे पाणी
अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतप इलेक्ट्रॉड पावडर किंवा साखर आणि मीठाचं पाणी पिणं आवश्यक आहे. रक्तदाब कमी झाल्यानंतर त्वरित साखर आणि मीठाचं पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय तुम्ही लिंबू पाण्याचंही सेवन करू शकता. तुम्ही कामासाठी बाहेर पडत असाल तर नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा.
कॉफी
रक्तदाब कमी झाल्यास कॉफीचं सेवनही शरीरास फायदेशीर ठरतं. कॉफीचं सेवन केल्यानं रक्तदाब नियंत्रात राहतो. अनेकांची सकाळ ही कॉफी प्यायल्यानंतर सुरू होते. जर चहा किंवा कॉफी घेतला नाही तर अनेकांना डोकं जड झाल्यासारख वाटतं. पण कॅफिनचं सर्वाधिक सेवन केल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं तसंच कॉफी योग्यवेळी घेतली नाही तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. उपाशी पोटी कॉफी प्यायल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. यामुळे अॅसिडीटी, अपचन आणि गॅस यांसारखे पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते.
गोड पदार्थ
अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर गोड पदार्थांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी केळी, पपई, मुळा या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. बाहेर जाताना सोबच एखादं चॉकलेट किंवा साखर ठेवल्यास अचानक असा त्रास झाल्यास उपयोगी ठरू शकतं.
रोज व्यायाम करणं
व्यायाम किंवा योगा रोज केल्यानं रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. उद्भवल्यास कमी तीव्रतेनं उद्भवते. यासाठी २० ते ३० मिनिट वेळ काढून रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्याने ब्लड फ्लो आणि सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. तसेच हे रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत करतं.
जेष्ठमध
कमी रक्तदाबावर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय घसा दुखत असेल किंवा सर्दी, खोकल्याची समस्या जाणवत असेल तर ज्येष्ठमध चघळ्याचा सल्ला दिला जातो. तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे अशा समस्यांसाठी ज्येष्ठमध गुणकारी ठरते. ज्येष्ठमधाचा काढा तयार करून प्यायल्यास आराम मिळतो.
तुळस
तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा-पंधरा पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
हे पण वाचा-
भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा
आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध