कोणत्याही ऋतूत खाज, पुळ्या, त्वचा लाल होण्याची समस्या उद्भवते. उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्यामुळे किंवा पावसाळ्यात ओले कपडे असल्यानं त्वचेवर घाम आणि चट्टे येतात. परिणामी तीव्रतेनं खाज येते. घट्ट कपडे वापरल्यामुळे शरीराला रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा त्रास वाढत जातो. रिंगवर्मला वैद्यकिय भाषेत टिनिया असं म्हटलं जातं. गोल आकारात पुळ्या येऊन खाज येते. संक्रमित व्यक्तीच्या वस्तू कपडे, टॉवेल याद्वारे इतरांना हा आजार होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास हा त्रास वाढत जातो. अनेकदा ट्रिटमेंट करूनही समस्या दीर्घकाळ राहते. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय वापरून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता.
फंगल इन्फेक्शनची लक्षणं
त्वचेला खाज येणे.
त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे.
त्वचेतून पांढऱ्या रंगाचा पदार्थ निघणे. भेगा पडणे. फटी पडणे.
सतत केस गळणे.
नखं पिवळी किंवा काळे पडणे.
फंगल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी उपाय
घट्ट कपडे घालू नका, ओले मोजे घालू नका, दररोज कपडे आणि यांना उन्हात वाळवा, नेहमी सैल आणि सुती कपडे घालणे चांगले आहे, वेळच्यावेळी नखं कापा, अॅंटी-बॅक्टेरिअल साबणाचा वापर करा. दुसऱ्यांचे कपडे, कंगवा, टॉवेल वापरू नका. याचा उपचार मध्येच सोडू नका. नाहीतर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. शक्यतो ऑफीसला जाणाऱ्या स्त्रीयांनी वेस्टन पध्दतीच्या शौचालयाचा वापर टाळावा. कारण त्या शौचालयात अवयवांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.
अॅलोव्हेरा जेल त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात मदत करतं. फंगल इन्फेक्शनमध्ये अॅलोव्हेरा जेलचा वापर केल्यास इन्फेक्शन कमी होतं. याने रॅशेज, खाज आणि जळजळ दूर केली जाते. यासाठी अॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा धुवावी.
कडूलिंबाची झाडे तुमच्या आजूबाजूला बरीच असतील. या झाडाच्या पानांची पेस्ट, काढा अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. कडूलिंबातील तत्व, जे एकप्रकारे अॅंटी-फंगल गुणाने भरपूर असतात. यासाठी कडूलिंबाची पानं बारीक करून पेस्ट तयार करा. यात एक चमचा लिंबाचा रस आणि हळद टाका. फंगल इन्फेक्शन झालेल्या भागात ही पेस्ट लावा. ३० मिनिटांनी ही पेस्ट लावूनच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा. याने त्वचा आणि डोक्याच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील.
हे पण वाचा-
CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...
महागड्या ट्रिटमेंट्सपेक्षा बडीशोपेचं तेल वापराल; तर केस गळण्याची समस्या कायमची होईल दूर
काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा