छातीत वेदना जाणवल्यानंतर लोक हार्ट अटॅक समजून घाबरतात. कारण हार्ट अटॅक येण्याच्या प्राथमिक लक्षणांमध्ये छातीतील वेदनांचा समावेश होतो. वयस्कर लोक, आधीपासूनच इतर रोगांचा धोका असलेले लोक घाबरून या आजाराला आणखी बळी पडतात. पण छातीत वेदना होणं हे हृदय रोगाचेच संकेत असू शकतात असं अजिबात नाही. अनेक कारणांमुळे छातीत वेदना होऊ शकतात. अनेकदा रोजच्या जगण्यातील निष्काळजीपणा या वेदनांसाठी कारणीभूत ठरत असतो. आजारांपासून वाचण्यासाठी निष्काळजीपणा टाळणं खूप महत्वाचं असतं. अनेकदा सामान्य एसिडिटी किंवा सर्दीमुळेही छातीत वेदना होता. त्यावेळी योग्य उपचार घेतल्यास मोठ्या आजाराचा धोका टळू शकतो.
फुफ्फुसांचा आजार
या आजारामुळे फुफ्फुसांमध्ये सूज वाढते. ही सूज वाढत गेल्यानं छातीत वेदना सुरू होतात. अनेकदा दम्याच्या त्रास जाणवतो. अनेकांना वारंवार गॅस झाल्यामुळेही छातीत वेदना होतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
आतील सुज
छातीच्या आतील भागांची सूज घातक ठरू शकते. जेव्हा छातीतील आतल्या भागाची सुज वाढत जाते तेव्हा छातीत अचानक वेदना सुरू होतात. वैद्यकिय परिभाषेत या स्थितीला प्लूरायटीस असं म्हणतात. निमोनिया असलेल्यांना या स्थितीचा सर्वाधिक सामना करावा लागतो.
हाडं तुटणं
जर कोणत्याही कारणास्तव छातीच्या बरगड्यांना इजा पोहोचली असेल तर वेदना सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत छातीत दुखल्यामुळे लोक अनेकदा घाबरतात. नसांमध्ये सूज आली तरीही छाती दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या वेदना थंड वातावरणात बर्याचदा जास्त असतात परंतु घाबरलेल्या परिस्थितीमुळे परिस्थिती आणखी बिघडते. अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार
एसिडिटी
सर्वाधिक लोकांना एसिडिटीमध्ये छातीत दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामध्ये एसिड वरच्या बाजूनं यायला सुरूवात होते. त्यामुळे आंबट ढेकर येतात, अशावेळी दोन दिवसात पोटाची समस्या बरी झाली नाही तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा