कोरोना काळात वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर कोरोनाच नाही इतर गंभीर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. फिट राहण्यासाठी अनेकजण दूध पितात. पण फक्त दूध पिण्यापेक्षा तुम्ही तुळशीच्या दूधाचे सेवन केलं तर सतत आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाण्याची गरज लागणार नाही. काढा पिण्यापेक्षा दुधाचे सेवन केल्याने तुम्ही आजारांपासून चार हात लांब राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे तुळशीचे दूध.
तुळस एक नैसर्गिक डिटॉक्सीफाइंग, क्लिंजिंग आणि प्यूरिफाइंग एजंट आहे. ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून बचाव करू शकता. त्याचबरोबर लिव्हर डिटॉक्स करण्यासाठीही तुळस मदत करते. दररोज तुळशीच्या १० ते १२ पानांचं सेवन करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबुत होण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
तुळस कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. तुळशीची पानं हृदयासाठी एका टॉनिकच्या स्वरूपात काम करतात. कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुळशीची पानं हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर यामध्ये एनलजेसिक इफेक्ट असतो. जो वेदना आणि सूज दोन्ही कमी करण्यासाठी मदत करतो.
तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो.
असं तयार करा तुळशीचं दूध
सगळ्यात आधी दिड ग्लास दूध उकळून घ्या उकळलेल्या दुधात ८ ते १० तुळशीची पानं घाला. हवं तर तुम्ही या दुधात हळद किंवा मध घालू शकता. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर या दुधाचे सेवन करा. तुळशीच्या दुधाच्या सेवनाने मायग्रेनची समस्या दूर होते. तर तुम्हाला ही समस्या सतत उद्भवत असेल तर रोज एक ग्लास तुळशीचे दूध प्यायल्यास समस्या कमी होईल.
हे पण वाचा :
२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या
अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान
लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा