Foods That Are Good For Liver: लिव्हर शरीरातील फार महत्वाचा अवयव असतो. लिव्हर हेल्दी राहीलं तर शरीर हेल्दी राहतं. लिव्हर शरीरात व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, प्रोटीनच्या स्टोरेजवरून काम करतं. इतकंच नाही तर लिव्हर शरीराला डिटॉक्साफाय करण्याचं काम करतं. याने शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढून शरीर हेल्दी ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी काही खास पदार्थांचा तुम्हाला आहारात समावेश करावा लागतो. चला जाणून घेऊ तुम्ही लिव्हर कसं हेल्दी ठेवाल.
लसूण
लसूण शरीरासाठी फार फायदेशी असतं. त्यामुळे तुम्ही जर लसणाचा आहारात समावेश केला तर याने लिव्हर हेल्दी राहील. याचं कारण लसणाने लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. लसणाच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. तेच लसणाच्या रोज सेवनाने इम्यूनिटी बूस्ट होते. यासाठी लसणाच्या एक दोन कळ्या रिकाम्या पोटी खाव्या.
गाजर
गाजरामध्ये भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि आयर्न असतं. त्याशिवाय यात भरपूर प्रमाणात अॅँटी-ऑक्सिडेंट असतं जे आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. गाजरचा तुम्ही आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश करू शकता. याला तुम्ही सूप, सलाद आणि ज्यूसच्या माध्यामातून सेवन करू शकता. गाजराने शरीरातील रक्तही वाढतं.
कलिंगड
कलिंगड खाण्यास टेस्टी असतं. तेच याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे याचं सेवन केलं तर शरीर डायड्रेट राहतं आणि शरीरातून टॉक्सिन बाहेर निघतात. तेच याने लिव्हरही डिटॉक्सीफाय होतं. ज्यामुळे शरीरा हेल्दी राहतं.