कोरोनाकाळात अनेक घरांमध्ये इतर आजारांकडे लक्षणं दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शरीर प्रोटिन्सची कमरता भासल्यानं वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. मुत्राद्वारे प्रथिन जास्त प्रमाणत शरीराबाहेर टाकले गेल्या प्रोटीन्सची कमतरता भासते. या समस्येला नेफ्रोटीक सिंड्रोम असं म्हणतात. लहान मुलांमध्ये हा आजार पसरण्याचं प्रमाण जास्त असतं. २ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना हा आजार उद्भवत असून मोठ्यांनाही या समस्येचा सामना करावा लागू शकतो. माय उपचारशी बोलताना डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं की, नेफ्रोटिक सिंड्रोममुळे पाय आणि टाचा सूजतात आणि इतरही समस्या उद्भवतात.
या आजारात किडनी चाळणीप्रमाणे कार्य करते. म्हणजेच शरीरातील विषारी आणि नको असलेले घटक बाहेर फेकण्याबरोबरच आवश्यक प्रोटीन्सही शरीराबाहेर पडू लागतात. परिणामी शारीरिक समस्या उद्भवतात. वेळीच या समस्येकडे लक्ष देऊन तपासणी केली नाही तर नेफ्रोटिक सिंड्रोम वाढत जाऊ शकतो. लघवीच्या माध्यमातून प्रथिन शरीराबाहेर जातात. त्यामुळे डोळे आणि पोटात सूज येते. यात किडनीतील लहान वाहिका ज्या गाळण्याचे काम करतात त्या खराब होतात. जर वेळीच योग्य उपचार केले नाही तर नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार दीर्घकाळ राहू शकतो.
लक्षणं
पोटात वेदना
उच्च रक्तदाब
भूक कमी लागणं
सतत लघवी होणं
तुमच्या घरातील लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसत असतील तर त्वरित तपासणी करू घ्या. जर नेफ्रोटिक सिंड्रोमचं कुठलंही लक्षण दिसत असेल तर लघवीतील प्रोटीन्सची तपासणी करावी. यात २४ तासांत लघवीची तपासणी करण्यास सांगितलं जातं. याने लघवीतील प्रोटिन्सचं प्रमाण किती आहे याबाबत माहिती मिळते. या आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी पण करतात.
या आजाराची तपासणी बायोप्सीद्वारे केली जाते. यात किडनीच्या पेशीचा छोटा नमुना घेऊन डॉक्टर जी प्रक्रिया करतात त्याला किडनीची बायोप्सी म्हणतात. बायोप्सीमध्ये त्वचेतून किडनीमध्ये विशेष सुई टाकली जाते तिच्या सहाय्याने किडनीच्या पेशी घेतल्या जातात आणि मग त्यांना लॅबमध्ये पाठवले जाते. त्यात रक्तातील प्रथिनांची पातळी योग्य आहे की नाही ते तपासलं जातं. जर त्यात प्रथिनांची पातळी कमी असेल तर आणि त्यासोबत ट्राइग्लीसेराइडचे प्रमाण पाहिले तर नेफ्रोटिक सिंड्रोमचे योग्य निदान करणं शक्य होतं. हा आजार वाढण्याआधीच लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
हे पण वाचा-
यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
Independance day: झटपट चविष्ट तिरंगा रेसेपीज, या स्वातंत्र्यदिनाला नक्की ट्राय करा