Never Eat These Thing in Empty Stomach: जेव्हा तुमचं पोट रिकामं असतं तेव्हा दिवसातील छोटसं काम करणंही अवघड होऊन बसतं. जर तुम्ही जास्त वेळ उपाशी राहिले तर अॅसिडिटी, पोटदुखी, उलटी यांसारख्या समस्या होतात. खासकरून सकाळी तुमच्या पोटात काहीच ताजं अन्न नसतं. तेव्हा यावेळी आपल्या खाण्या-पिण्याबाबत फार काळजी घ्यावी लागते. जर आपण काहीही चुकीचं खाल्लं तर गंभीर समस्या होऊ शकतात. डाइटीशियन डॉ. आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांच सेवन करू नये.
मद्यसेवन (Alcohol)
मद्यसेवन करणं नेहमीच आरोग्यासाठी नुकसानकारकच राहिलं आहे. हे बंद केलं तरच तुम्ही फायद्यात रहाल. कारण याच्या सेवनाने लिव्हल डॅमेज आणि हार्ट अटॅकचा धोका असतो. तेच जर मद्यसेवन रिकाम्या पोटी केलं तर जास्त नुकसान होतं. जर काहीच न खाता तुम्ही मद्यसेवन केलं तर ते डायरेक्ट तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये पोहोचेल. ज्यामुळे पल्स रेट खाली येऊ शकतो. ब्लड प्रेशरही कमी जास्त होऊ शकतो.
च्युइंग गम (Chewing Gum)
लहान मुलं आणि तरूणांमध्ये च्युइंम चघळण्याची फार क्रेज़ आहे. पण रिकाम्या पोटी असं करणं फार महागात पडू शकतं. नॅच्युरल प्रोसेसनुसार, जेव्हाही तुम्ही काही खाणं किंवा चघळणं सुरू करता पोटात डायजेस्टिव अॅसिड रिलीज होऊ लागतं. रिकाम्या पोटात हे अॅसिड स्टोमक अल्सर किंवा अॅसिडिटीची समस्या तयार करू शकतं. त्यामुळे च्युइंग गम कधी रिकाम्या पोटी खाऊ नये.
कॉफी (Coffee)
कॉफी प्यायल्याने थकवा दूर होतो आणि ताजतवाणं वाटतं. बऱ्याच लोकांना सकाळी झोपेतून उठल्यावर कॉफी पिण्याची सवय असते. पण अजिबात करू नये. कारण या पेय पदार्थामध्ये असलेल्या तत्वांमुळे पोटात हाइड्रोक्लोरिक अॅसिड वाढू लागतं आणि मग पोटात जळजळ होऊ लागते.