डॉ. जतिन भाटिया, सल्लागार- रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे
सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दर दोन महिलांपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) झाल्याचे निदान होते व त्यापैकी एकीचा मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरवर शस्त्रक्रिया केली जाते. यात पूर्णपणे ब्रेस्ट काढून टाकले जातात (मास्टॅक्टॉमी) किंवा आजाराच्या अवस्थेनुसार, काखेतील लिम्फ नॉड्सवर उपचार करत, सामान्य पेशींभोवती कडे करून फक्त कर्करोगाची गाठ काढून घेतली (स्तन संरक्षण शस्त्रक्रिया) जाते.
पण स्तन संरक्षण शस्त्रक्रियेत पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता (त्याच ठिकाणी पुन्हा कर्करोग होण्याची) जास्त असते. साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या काही सूक्ष्म पेशी तशाच राहण्याची शक्यता असते. तसेच संपूर्ण स्तन काढून टाकल्यावरही प्रतिकूल परिणाम दिसतात. त्याचा तपशील हिस्टोपॅथोलॉजिकल रिपोर्टमध्ये दिला जातो. यात पुन्हा त्याच ठिकाणी कर्करोग होण्याचा धोका वर्तवलेला असू शकतो. हे धोके टाळण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपीचा वापर करणे खूप आवश्यक आहे.
रेडिएशन थेरपीचा समावेश केल्याने पुन्हा संबंधित ठिकाणी कर्करोग उलटण्याची शक्यता २० ते ३० टक्क्यांनी कमी होते, हे सिद्ध करणारे अनेक संशोधन समोर आले आहेत. रेडिएशन थेरपीत उच्च क्षमतेच्या क्ष किरणांच्या उपचारांचा समावेश असतो. ते डीएनए (ज्या पेशींमध्ये आनुवंशिक घटक असतात त्यातील रसायन)वर हल्ला करतात. हल्ला केल्यानंततर, खराब झालेल्या पेशी ही जखम भरून काढण्याचा प्रयत्न करतात. त्या यशस्वी ठरल्यास, पेशी जिवंत राहतात. पण अपयशी ठरल्यास या पेशी मरतात. सामान्य पेशींच्या तुलनेत कर्करोगाच्या पेशींची दुरुस्ती होण्याची क्षमता खूप कमी असते. यामुळे कर्करोगाच्या पेशी मरण पावतात.
रेडिएशन थेरपी ही ३ आठवड्यांपर्यंत सोमवार ते शुक्रवारी १५ दैनंदिन बैठकांमध्ये केली जाते. ज्या भागात कर्करोगाची शक्यता आहे, तेथेच ही प्रक्रिया केली जाते. यात संपूर्ण स्तन, छातीची भिंत किंवा काही ठिकाणी काखेतील काही भाग, त्याच भागातील मानेचा खालचा भाग यांचाही समावेश असतो. काही केंद्रांमध्ये ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी अत्युच्च प्रमाणातील ५ डोसही दिले जातात. काही परिस्थितीत १५ पेक्षा जास्त बैठका आवश्यक असतात. उदा. स्तन संरक्षण शस्त्रक्रियेनंतर कर्गरोगाच्या भागाला ५ आणखी सिटिंग्स दिल्या जातात. कधी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने (IMRT) १५ सिटिंग्स करताना हे समाविष्ट केले जाऊ शकते.
तसेच कधी कधी स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होते. तेव्हा अॅक्सलरेटेड पार्शिअल ब्रेस्ट इरॅडिएशन (APBI) हा रेडिएशन थेरपीचा विशेष उपचार फक्त ब्रेस्ट कॅन्सरच्या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारचे रेडिएशन देण्यासाठी अनेक तंत्र उपलब्ध आहेत. उदा. टेलिथेरपी( लिनिअर अॅक्सेलरेटर्स), ब्रॅचीथेरपी आणि इंट्रा ऑपरेटिव्ह रेडिएशन थेरपी(IORT).
कोरोना संसर्गानंतर सर्वाधिक लोकांना उद्भवतोय 'हा' आजार; आरोग्यमंत्रालयाने दिल्या गाईडलाईन्स
स्तनांच्या कर्करोगात रेडिएशन थेरपी हा एक अतिशय सुरक्षित उपचार आहे. यात गंभीर पातळीवरील परिणामांची शक्यता ५ टक्क्यांनी कमी होते. तथापि, हृदयाच्या जवळ असल्याने डाव्या बाजूच्या स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते. कधी कधी डोस कमी करण्यासाठी आम्ही गेटिंग किंवा डीप इन्स्पिरेटरी ब्रीझ होल्ड (DIBH) नावाचे तंत्रज्ञान वापरतो, जेथे रुग्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली श्वासोच्छ्वास (सहसा २० सेकंदांपेक्षा जास्त नसतो) घेते. यामुळे फुप्फुस हृदयाला डाव्या स्तनापासून दूर ढकलते.
डोळ्यांच्या कॉर्नियावरही होऊ शकतो कोरोना व्हायरसचा परिणाम?; नव्या संशोधनातून खुलासा
अगदी शेवटच्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगातही, वेदना कमी करण्यासाठी, पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स रोखण्यासाठी, रक्तस्राव थांबवण्यासाठी रेडिएशन थेरपी महत्त्वाचे योगदान देते. एकूणच, रेडिएशन थेरपी ही स्तनांच्या कर्करोगावरील उपचारात जवळपास प्रत्येक टप्प्यावर एक महत्त्वाचा भाग आहे. शस्त्रक्रिया ऑन्कोलॉजिस्ट्स, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट यांच्या बहुशिस्तीतील निर्णयानंतर हे उपचार करता येतात.