Liver detox drink : शरीरातील अनेक महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर. रक्त शुद्ध करणं, अन्न पचनास मदत करणं, काही महत्वाचे तत्व रिलीज करण्याचं काम लिव्हर करतं. पण जर लिव्हरची योग्य काळजी घेतली नाही तर ते खराब होतं आणि याने शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. लिव्हर खराब होण्याची वेगवेगळी कारणे आहेत जसे की, जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, धुम्रपान करणे आणि मद्यसेवन यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही.
अशात लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. यातीलच एक आयुर्वेदिक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका खास पेयाचं सेवन करून तुम्ही कमीत कमी दिवसात लिव्हर डिटॉक्स करू शकता. मनुके आणि त्याच्या पाण्याने लिव्हर डिटॉक्स केलं जाऊ शकतं.
काय होतात या पाण्याचे फायदे?
मनुक्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात फायदेशीर असतात. तसेच यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवले तर याचे फायदे अधिक वाढतात. जर मनुक्याचं पाणी रोज सकाळी अनोशा पोटी सेवन केलं तर याने अनेक प्रकारचे फायदे होतात.
रेसिपी
हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी २ कप पाणी घ्या आणि १५० ग्रॅम मनुके घ्या. डार्क रंगाचे १५० ग्रॅम मनुके चांगले धुवून घ्या. २ कप पाणी उकडायला ठेवा आणि त्यात मनुके टाका. २० मिनिटे हे उकडू द्या. आता मनुके रात्रभर याच पाण्यात राहू द्या. सकाळी तुमचं ड्रिंक तयार होईल.
सेवन करण्याची पद्धत आणि वेळ?
सकाळी अनोशा पोटी नाश्त्याच्या अर्धा तासआधी हे पाणी सेवन करू शकता आणि त्याआधी या पाण्यातील मनुके वेगळे काढा. आता पाणी सेवन करू शकता. तसेच मनुके खाऊ शकता. केवळ ३ दिवस हा उपाय कराल तर लिव्हरमधील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जाती. याने लिव्हर पूर्णपणे साफ होईल.
काय आहेत याचे फायदे?
- मनुक्याच्या पाण्यात असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट्सने बॉडी सेल्स हेल्दी होऊन कॅन्सरचा धोका कमी होतो. मनुक्याच्या पाण्याने मेटाबॉलिज्म मजबूत करून फॅट बर्निंग प्रोसेज वाढते. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
- या पाण्यात अमिनो अॅसिड असतं जे एनर्जी देतं. याने थकवा आणि कमजोरी दूर होते. तसेच या पाण्यात व्हिटॅमिन ए, बीटा केरोटीन आणि डोळ्यांसाठी फायदेशीर फायटोन्यूट्रिएंट्स असतात. याने नजरेची कमजोरी दूर होते.
- या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते. तसेच मनुक्यातील सॉल्युबल फायबर पोटही साफ ठेवून गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम देतं. मनुक्याच्या पाण्यात आयर्न, कॉपर आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. याने रक्ताची कमतरता दूर होऊ लाल रक्त पेशी हेल्दी होतात.