Side Effect of Sugar: : साखर एक असा पदार्थ आहे ज्याचा वापर वेगवेगळे गोड पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. आजकाल कंपन्या याचा वापर पॅकेजिंग फूड्स तयार करण्यासाठी करतात. अशात लोकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, त्यांनी किती पॅकेजिंग ड्रिंक्स आणि फूड्सचं सेवन करावं व किती करू नये. सध्याच्या काळात शरीर सांभाळून ठेवणं फार आवश्यक आहे. कारण मनुष्याने स्वत:ला निसर्गापासून वेगळं केलं आहे. ज्याचा परिणाम म्हणजे वेगवेगळे आजार होतात. अशात चला जाणून घेऊ साखरेचं जास्त सेवन केल्याने काय नुकसान होतं.
एनर्जीमध्ये होतो बदल
शरीरात ब्लड शुगर लेव्हल योग्य प्रमाणात ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हाही तुम्ही गोड पदार्थांचं सेवन करता तेव्हा पोटाच्या कोशिकांमध्ये जाऊन इन्सुलिन सोडतात. ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मिठाचं सेवन करता तेव्हा याने तुम्हाला जास्त झोप किंवा लवकर थकवा येण्याची समस्या होते.
चेहऱ्यावर दुष्परिणाम
जेव्हा कधी तुम्ही साखरेचं जास्त सेवन करत तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर पडतो. तुम्हाला जास्त गोड खाल्ल्याने पिंपल्सची समस्या होऊ लागते. याच कारणाने पूर्वीच्या काळात लोक जखम झाली तर यादरम्यान गोड पदार्थांचं सेवन करण्यास मनाई करत होते. कारण याने इन्सुलिन त्वचेत तेल ग्रंथी वाढू शकतात. ज्यामुळे जखम पिकणं आणि पिंपल्स होण्याची समस्या होऊ लागते.
वजन वाढतं
नेहमीच जिमला जाणारे लोक साखरेच्या सेवनापासून दूर राहतात. कारण याचं सेवन केल्याने कंरबेच्या दोन्ही भागात चरबी वाढू लागते. ज्यामुळे पोटही बाहेर येऊ लागतं आणि अशात तुमचं शरीराचं वजनही वेगाने वाढतं. जे अजिबात चांगलं नाही. त्यामुळे जास्त साखरेचं सेवन करू नये.
पुन्हा पुन्हा सर्दी होणं
अनेकदा लोक वेळ वाचवण्यासाठी किंवा कंटाळा येतो म्हणून पॅकेजिंग फूडचा जास्त वापर करतात. पॅकेजिंग फूड्स जसे की, बिस्कीट, ज्यूस, फ्रुटी, केकमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. ज्याने शरीरात खराब इन्सुलिन रिलीज होतं. ज्यामुळे तुम्हाला वायरल ताप, फ्लू होण्याची समस्या सुरू होऊ शकते.