Side Effects of Bath at Night: शरीर निरोगी असणं ही सगळ्यात मोठी संपत्ती मानली जाते. शरीर स्वच्छ असेल तर आजार होण्याचा धोका कमी राहतो आणि आपण निरोगी राहतो. उन्हाळ्यात घाम जास्त येतो. अशात लोक कामाहून घरी परत आल्यावर घाम आणि थकवा दूर करण्यासाठी रात्री आंघोळ करतात. पण अनेक लोक याबाबत कन्फ्यूज राहतात की, रात्री आंघोळ करणं योग्य की अयोग्य? चला जाणून घेऊ याबाबत...
काय सांगतात एक्सपर्ट्स?
- काही लोकांना वाटतं की, रात्री आंघोळ केल्याने शरीराला फायदा मिळतो. पण हेल्थ एक्सपर्टचा सल्ला या उलट आहे. हेल्थ एक्सपर्ट्स रात्री उशीरा आंघोळ न करण्याचा सल्ला देतात. त्यांचं मत आहे की, रात्रीच्या वेळ तापमान थंड राहतं. अशावेळी आंघोळ केली तर सर्दी-खोकला होण्याचा धोका अधिक राहतो.
- रात्री थंडी वाढल्यावर जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा ताप येण्याचीही शक्यता अधिक असते. जर तुम्ही रात्री गरम पाण्याने आंघोळ केली तर टेंपरेचर डिफरन्समुळे तापासारखं लक्षण दिसू शकतं.
- रात्री उशीरा आंघोळ केली तर शरीराच्या मेटाबॉलिज्ममध्ये गडबड होऊ शकते. ज्यामुळे पचनक्रियाही बिघडू शकते. जर तुमचं मेटाबॉलिज्म बिघडलं तर शरीरात हार्मोन्स रिलीज होण्यास समस्या होते.
- डॉक्टर्स सांगतात की, रात्रीच्या वेळी आंघोळ करणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे मसल्समध्ये वेदना होतात आणि छातीतही वेदना होऊ शकतात. कधी कधी रात्री आंघोळ केल्याने डोक्यात जडपणाही वाटतो.
- रात्री उशीरा आंघोळ केल्याने शरीरातील जॉइंटमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमची समस्या वाढू शकते. रात्री आंघोळ केल्याने मसल्समध्ये आखडेपणाही येऊ शकतो.
- हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, रात्री आंघोळ करण्याऐवजी शरीर ओल्या कपड्याने पुसून घ्यावं. हे जास्त बरं होईल आणि वेगवेगळ्या समस्यांचा धोकाही कमी होईल. रात्री आंघोळ केल्यावर शरीरावर लोशनचा वापर करू शकता.