(Image Credit : www.eatthis.com)
नवी दिल्ली : जर तुम्हीही ऑफिसमध्ये सतत एका जागी बसून काम करण्याचे अनेक तोटे तुम्ही अनुभवले असतील किंवा ऐकले असतील. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वेळीच सावध न झाल्यास एकाच जागी बसून सतत काम करणे तुम्हाला महागात पडू शकतं.
काय म्हणतो रिसर्च?
या अभ्यासानुसार, एकाच जागी बसून राहिल्याने मेंदुतील रक्तप्रवाह कमी होतो. हा अभ्यास ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम करणाऱ्या काही लोकांवर करण्यात आला. यात सांगण्यात आलं आहे की, जास्तवेळ बसून राहणे मेंदुच्या आरोग्यासाठी नुकसान पोहोचणारं आहे. पण जर तुम्ही प्रत्येक अर्ध्या तासाने उठून दोन मिनिटांसाठी चालत असाल तर याने तुमच्या मेंदुतील रक्तप्रवाह वाढतो.
मेंदुमध्ये रक्तप्रवाह होणे आपल्या शरीरासाठी एक सामान्य प्रक्रिया आहे. मेंदुतील पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची गरज असते जे रक्ताद्वारे मिळतात. तसेच डोक्यात एक मोठी रक्तावाहिनी सुद्धा असते जे डोक्यात रक्त पुरवते. पण जास्तवेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने ही प्रक्रिया प्रभावित होते.
स्मरणशक्तीवर प्रभाव पडतो
याआधी मनुष्यांवर आणि जनावरांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मेंदुतील रक्तप्रवाह थोडा जरी प्रभावित झाला तर विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीवरही प्रभाव पडतो. अशावेळी डेमेंशिया आणि मेमरी लॉस सुदधा होण्याची शक्यता असते.
कुणी केला अभ्यास?
यावेळी हा अभ्यास इंग्लंडच्या Liverpool John Moores University मध्ये करण्यात आलाय. हा अभ्यास Journal of Applied Physiology मध्ये प्रकाशित करण्यात आलाय. हा अभ्यास करताना अभ्यासकांनी ऑफिसमध्ये तासंतास बसून काम करणाऱ्या १५ लोकांवर याचा परिणाम पाहिला. या सर्वांनी सतत ४ तास एकाच जागेवर बसून काम केले. हे लोक केवळ बाथरुमला जाण्यासाठीच आपल्या जागेवरुन उठतात. अभ्यासकांनी यांच्या ब्रेकच्या आधीच्या आणि नंतरच्या ब्लड सर्कुलेशनला ट्रॅक केलं.
काय करावे?
या अभ्यासातून समोर आलेले परिणाम तसेच निघाले जशी अपेक्षा होती. जे सतत ४ तास बसून काम करत होते त्यांच्या मेंदुतील रक्तप्रवाह कमी झाला होता. आणि जेव्हा ते २ मिनिटे चालले तेव्हा त्यांच्या रक्तप्रवाह वाढला सुद्धा. या अभ्यासाच्या प्रमुख सोफी कार्टर यांनी ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना थोड्या थोड्या वेळाने चालण्याचा सल्ला दिला आहे.