Health Tips : बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक अनेक गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. अशात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. असं केलं नाही तर हार्ट अटॅक (Heart Attack), पोषणात कमतरता, हाय बीपी किंवा शुगर लेव्हलची (Blood Sugar Level) समस्या निर्माण होऊ शकते. अशाप्रकारच्या समस्या तुम्हाला होण्याआधी तुमच्या काय बदल होत आहेत याकडे लक्ष द्यावं लागेल. काही लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे.
ब्लड शुगर वाढल्याने होतात हे बदल
तुम्ही पाहिलं असेल की, जास्तीत जास्त लोकांची शुगर लेव्हल अलिकडे सतत वाढत असते. अशात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतात. अशात आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याने तुम्ही अशाप्रकारच्या समस्यांपासून दूर रहाल. चला जाणून घेऊ ब्लड शुगर लेव्हल वाढली तर तुमच्या पायात कसा बदल दिसतो.
- सर्वातआधी तर तुम्हाला दिसेल की, पाय सुन्न होतो. हे सतत होत असेल तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण हा शुगर लेव्हल वाढण्याचाही संकेत असू शकतो.
- पायावर सूज येणं हाही शुगर लेव्हल वाढण्याचा संकेत असू शकतो. जर तुमच्या पायावर कोणत्याही प्रकारची सूज दिसत असेल तर तुम्ही थोडं अलर्ट रहायला पाहिजे.
- त्यासोबतच तुमच्या पायावर काही जखम झाली असेल आणि ती लवकर भरत नसेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. यात जराही उशीर केला तर समस्या आणखी वाढू शकते.