Health Tips : प्रोटीन केवळ आपल्या मांसपेशी मजबूत करतं असं नाही तर शरीराला एनर्जी देण्याचंही काम करतं. प्रोटीन अॅंटीबॉडीज तयार करण्यात मदत करतं जे इन्फेक्शन आणि आजारांसोबत लढण्याचं काम करतात. याने आपली त्वचा, एन्जाइम्स आणि हार्मोन्ससाठीही बिल्डींग ब्लॉक असतं. शरीरात प्रोटीनची कमतरता (Protein Deficiency) झाली तर आरोग्याला धोका होऊ शकतो. शरीरात प्रोटीन कमी झालं तर शरीर काही संकेत देतं.
अवयवांवर सूज - शरीराच्या कोणत्याही अवयवाव सूज येऊ लागली तर मेडिकल भाषेत याला एडिमा असं म्हणतात. डॉक्टर सांगतात की अवयवयांमध्ये सूज ह्यूमन सीरम एल्बुमिनच्या कमतरतेमुळे होते. जे ब्लड किंवा ब्लड प्लाज्माच्या लिक्विड पार्टमध्ये असलेलं प्रोटीन आहे. यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवात सूज आली असेल तर दुर्लक्ष करू नका.
लिव्हरची समस्या - शरीरात प्रोटीनची कमतरता झाली तर लिव्हरसंबंधी समस्याही वाढू लागतात. प्रोटीनच्या कमतरतेमुळे लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅट जमा होऊ लागतं. याने लिव्हरमध्ये सूज, जखमा किंवा लिव्हर फेलची शक्यता वाढते. लठ्ठपणा किंवा अल्कोहोलचं अत्याधिक सेवन करणाऱ्यांमध्ये ही समस्या जास्त आढळते.
त्वचा, केस आणि नखं - प्रोटीनची कमतरता झाली तर याचा प्रभाव आपल्या त्वचेवर, केसांवर आणि नखांवरही स्पष्टपणे दिसू लागतो. प्रोटीनची कमतरता झाली तर त्वचा फाटू लागते. त्वचेवर लाल चट्टे किंवा डाग दिसू लागतात. केस कमजोर होऊन गळू लागतात. नखं पातळ होतात आणि त्यांचा आकार बदलू लागतो.
कमजोर मांसपेशी - मासंपेशी मजबूत बनवण्यात प्रोटीनची सर्वात मोठी भूमिका असते. शरीरात प्रोटीनची कमतरता झाली तर शरीर बॉडी फंक्शन आणि आवश्यक कोशिकांसाठी हाडांमधून प्रोटीन घेऊ लागतं. याने मांसपेशी कमजोर होण्यासोबतच हाडं फ्रॅक्चर होण्याचाही धोका असतो.
इन्फेक्शनचा धोका - प्रोटीनच्या कमतरतेमुळे इम्यूनिटी सिस्टीमवर प्रभाव पडतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे इम्यून योग्यप्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे इम्यूनिटी खराब झाल्याने इतर आजारांचा धोका वाढतो. एका रिसर्चनुसार, वयोवृद्ध लोकांमध्ये ९ आठवडे सतत प्रोटीनची कमतरता झाल्याने इम्यूनिटी रिस्पॉन्सवर वाईट प्रभाव पडतो.