Health Tips : आरोग्यासाठी फायदेशीर फळांमध्ये पपई फार वरच्या नंबरवर येते. पपईमध्ये असे अनेक गुण असतात ज्याने शरीराला फायदे मिळतात. पपई आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असते. पपई खाल्ल्याने वजन कमी होतं, पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीस कंट्रोल करण्यासही मदत मिळते.
पपईमध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, ए, ई, बी, खनिज, प्रोटीन आणि डायटरी फायबरसारखे अनेक पोषक तत्व आढळून येतात. केवळ इतकंच नाही तर यात अल्फा, बीटा, कॅरोटीन आणि ल्यूटिन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंटही असतं.
पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स 60 असतो आणि यात डायटरी फायबर आढळतं, त्यामुळेच फिटनेस एक्सपर्ट रोज पपई खाण्याचा सल्ला देतात. पपईमध्ये आढळणारं पॅपीन एंजाइम अॅलर्जीसोबत लढतं आणि जखम भरण्यास मदत करतं. बरेच फायदे असूनही पपईचं सेवन करण्याचे काही नुकसानही आहेत.
फिटनेस गुरू होलिस्टिक एक्सपर्ट मिकी मेहता यांनी सांगितलं की, कोणते पदार्थ पपईसोबत खाल्ल्याने विषासारखा प्रभाव होऊ शकतो. हे पदार्थ पपईसोबत खाल्ले तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ कोणते आहेत ते पदार्थ...
लिंबासोबत पपई
पपई आणि लिंबाचं एकत्र सेवन चांगलं मानलं जातं नाही. जर तुम्ही सलादमध्ये पपई खात असाल तर त्यात लिंबाचा रस टाकू नका. याने ते विषारी होतं. लिंबू आणि पपई एकत्र खाल्ल्याने हीमोग्लोबिन लेव्हल असंतुलित होते आणि व्यक्ती एनीमियाचा शिकार होऊ शकते. त्यामुळे चुकूनही पपईसोबत लिंबूचं सेवन करू नका.
दह्यासोबत पपई
पपई उष्ण असते तर दही हे थंड असतं. त्यामुळे पपईनंतर लगेच दही खाणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही पपई खाल्ली असेल तर त्यानंतर दोन ते तीन तासांनंतरच दही खा. थंड आणि उष्ण हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. याने तुम्ही आजारी पडू शकता.
संत्रीसोबत पपई
लिंबूप्रमाणेच संत्रीही आंबट असतात. फ्रूट सलादमध्ये पपई आणि संत्री एकत्र करून कधीच खाऊ नये. याने पोटात विषारी पदार्थ तयार होतात. ज्यामुळे तब्येत बिघडू शकते.
टोमॅटोसोबत पपई
पपई आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन चांगलं मानलं जात नाही. या दोन्हींचं एकत्र सेवन करणं विषार ठरू शकतं. त्यामुळे पपई आणि टोमॅटो कधीच एकत्र खाऊ नये.
कीवीसोबत पपई
कीवी एक आंबट फळ आहे. पपईसोबत कीवी खाल्ल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे हे दोन फळ एकत्र कधीच खाऊ नये.